10 वर्षे माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं हसूच नाहीसं ...

10 वर्षे माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं हसूच नाहीसं झालेलं, सारा अली खानने अमृता सिंह आणि सैफ अली खानच्या नात्याचा केला खुलासा (‘My Mother Went To Laugh For 10 Years’, Sara Ali Khan Revealed On The Relationship Between Mother Amrita Singh And Father Saif)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या चित्रपटांसाठी जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. ती आपल्या प्रोफेशनल ते पर्सनल लाईफबद्दल मोकळेपणाने बोलत असते. मग ती आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान यांच्या नात्याबाबत असेल तरीही.

सारा अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलली आहे. पुन्हा एकदा साराने एका मुलाखतीदरम्यान अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या नात्याची चर्चा केली. यावेळी साराने सांगितले की तिची आई आणि वडील एकत्र कधीच आनंदी नव्हते.

अलीकडेच सारा अली खानने एका मासिकासाठी मुलाखत दिली होती. त्याच मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की, “लहान वयात लवकर समजूतदार होणाऱ्यांपैकी मीही एक होते. जेव्हा मी फक्त 9 वर्षांची होते, तेव्हा मला वाटायचे की माझे पालक एकत्र राहून आनंदी नाहीत. विभक्त झाल्यानंतर दोघेही खूप आनंदात होते. उदाहरणार्थ, माझी आई 10 वर्षे हसली नसेल, परंतु अचानक ती खूप आनंदी आणि सुंदर दिसू लागली. आणि माझे आई-वडील वेगळे राहून आनंदी आहेत तर मी का दुःखी होऊ? मला वाटत नाही की यात काही अवघड आहे.”

मुलाखतीदरम्यान साराने पुढे सांगितले की, “आता दोघेही पूर्वीपेक्षा खूप सकारात्मक आणि आनंदी आहेत. मी माझ्या आईला हसताना, विनोद करताना पाहू शकते जे मी खूप दिवसांपासून मिस करत होते. आईला पुन्हा असे बघून खूप दिलासा मिळाला. याआधी एका मुलाखतीदरम्यान सारा अली खान म्हणाली होती की, तिचे वडील सैफ अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांचे वेगळे होणे हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय होता.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. त्यांना इब्राहिम अली खान आणि सारा अली खान ही दोन मुले आहेत. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत लग्न केले.

सैफला करीनापासून  तैमूर आणि जहांगीरही दोन मुले आहेत. आज जरी अमृता सिंग आणि सैफ अली खान एकत्र नसले तरी त्यांची दोन मुलं इब्राहिम आणि सारा यांची तैमूर, जहांगीर आणि करीनासोबत खूप चांगली बॉन्डिंग आहे. सारा आणि इब्राहिम तैमूर आणि जहांगीरवर खूप प्रेम करतात.