विवेक अग्निहोत्री कंगना रणावतला चित्रपटात घेणार...

विवेक अग्निहोत्री कंगना रणावतला चित्रपटात घेणार नाही. ‘मला ॲक्टर्स हवेत, स्टार्स नकोत’ – इति अग्निहोत्री ( ‘My Films Need Actors, Not Stars…’ Says Vivek Agnihotri, The Kashmir Files Director : Denies Working With Kangana Ranaut)

द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अभिनेत्री कंगना रणावतसोबत सिनेमा बनवणार असल्याच्या वावड्या मागील काही दिवसांत उठल्या होत्या. द कश्मीर फाइल्सच्या यशानंतर आता विवेक त्यांची आगामी फिल्म द दिल्ली फाइल्स प्रदर्शित करण्याच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान विवेक त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये कंगनाला साइन करणार असल्याच्या बातम्या कानावर आल्या. यावर उत्तर देताना विवेक यांनी, ‘मला स्टार्स नाही तर ॲक्टरची गरज आहे’ असे म्हटले.

विवेकने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, ‘१२ वर्षांपूर्वी जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यावेळेस निर्णय घेतला होता की, मी कधीही स्टार किंवा स्टार ओरिएंटेड चित्रपट बनवणार नाही. मी माझ्या पद्धतीने काम करणार. सिनेमा हे लेखक-दिग्दर्शकांचे माध्यम आहे, असे मी मानतो.’

सध्या विवेक द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल खूप खूश आहेत आणि त्याच्याच प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ब्रिटिश संसदेने पल्लवी जोशी आणि विवेक यांना आमंत्रित केले आहे. काश्मिरी पंडितांबाबत जे घडले त्याचे सत्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे, अशी विवेक यांची इच्छा आहे.