‘मी प्रत्येक मुलीला आय लव्ह यू म्हणत होतो...

‘मी प्रत्येक मुलीला आय लव्ह यू म्हणत होतो. माझं चारित्र्य खराब होतं’- गौहर खानशी झालेला साखरपुडा का मोडला, याची साजिद खानने दिली कबुली (‘My character was loose then… Said ‘I love you’ to many girls’ Sajid Khan’s confession on why his engagement with Gauhar Khan broke)

बिग बॉस 16 मध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. मी टू मोहिमेअंतर्गत अनेक मॉडेल, अभिनेत्रींनी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आताही अनेक अभिनेत्री साजिदविरोधात धक्कादायक खुलासे करत असून त्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. आता हे प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, साजिद खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याचे चारित्र्य खराब असल्याचे म्हटले आहे.

साजिद जेव्हा किरण जुनेजा यांच्या ‘कोशिश के कामयाबी तक’या शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा तिथे तो त्याच्या आधीच्या सर्व नात्यांबद्दल स्पष्टपणे बोलला होता. सोबतच त्याने आपला गौहर खानसोबतचा साखरपुडा का मोडला हे देखील सांगितले. साजिदचा तो व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, किरण जुनेजा साजिद खानला गौहर खानसोबत ब्रेकअप करण्याचे कारण विचारते, त्यावर साजिद म्हणतो, “त्यावेळी माझे चारित्र्य खूप खराब होते. तेव्हा मी अनेक मुलींसोबत फिरायचो आणि अनेकदा खोटे बोलायचो. मी कोणाशीही गैरवर्तन केले नाही. पण मी प्रत्येक मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का असे विचारायचो.

व्हिडिओमध्ये साजिद पुढे म्हणतो की जर सर्व काही त्याच्या बाजूने असते तर मी 350 वेळा लग्न केली असती. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व महिला माझी आठवण काढत असतील आणि शिव्याही देत असतील,  त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेली प्रत्येक महिला आता त्याचा खूप द्वेष करत आहे.

गौहर खान सध्या जैद दरबारसोबत लग्न करून आनंदी आयुष्य जगत आहे, मात्र जैदच्या आधी गौहर कुशल टंडनला डेट करत होती. याआधी गौहर साजिद खानसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार गौहर खानने 2003 मध्ये साजिदसोबत साखरपुडाही केला होता, पण साजिद खानच्या कृत्यांमुळे तिने तो मोडला. नाहीतर आज गौहर खान साजिद खानची पत्नी आणि फराह खानची वहिनी झाली असती.

साजिदने बिग बॉसच्या घरात रहावे की नाही याबाबत सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. मध्यंतरी त्याला काढून टाकणार असल्याचे बोलले जात होते. पण आता तो जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत त्याला काढणार नसल्याचे बोलले जात आहे.