सोनम कपूरचा लेक वायू कपूर झाला 6 महिन्यांचा, म्...

सोनम कपूरचा लेक वायू कपूर झाला 6 महिन्यांचा, म्हणाली तू माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद आहेस (‘My biggest blessing…’ Sonam Kapoor shares an adorable photo of son Vayu on his 6th-month birthday, Pens a heartfelt note)

सोनम कपूर सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा जगत आहे आणि मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षीच सोनम आणि आनंद आहुजा यांच्या आयुष्यात एका गोड मुलाचे आगमन झाले. त्याचे नाव त्यांनी वायु ठेवले. सोनम अनेकदा सोशल मीडियावर वायुची हलकीशी झलक दाखवली आहे मात्र अद्याप तिने आपल्या मुलाचा पूर्ण चेहरा दाखवलेला नाही. सोनम कपूरचे चाहते तिच्या बाळाची झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सोनम कपूरने आपला मुलगा वायुची एक अतिशय गोंडस झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे, त्याला पाहून चाहतेही खूश झाले आहेत. सोनम कपूर-आनंद आहुजा यांचा मुलगा वायु आज 6 महिन्यांचा झाला आहे. अभिनेत्रीने हा आनंद खास पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केला. यासोबतच मुलासाठी एक अतिशय क्यूट पोस्टही लिहिली आहे.

सोनम कपूरने मुलाची सुंदर झलक इन्स्टाग्रामवर दाखवली आहे. सोनम कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये मायलेक दोघेही नाईट सूटमध्ये दिसत आहेत. सोनमने वायूला पकडले आहे आणि वायु खेळताना दिसत आहे. मात्र, या फोटोतही वायुचा चेहरा एकाच बाजूने दिसत असून त्याचा पूर्ण चेहरा समोर आलेला नाही.

याशिवाय सोनमने या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये वायु पांढरा कुर्ता पायजामा घालून खेळताना दिसत आहे. सोनम कपूरने या पोस्टसोबत मनातली गोष्ट लिहिली. तिने लिहिले, “वायू 6 महिन्यांचा झाला आहे. जगातील सर्वोत्तम नोकरी… आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद… मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या मुला… तुझे वडील आणि मी यापेक्षा जास्त कशाचीच इच्छा करत नाही.”

सोनम कपूर आणि वायुचा हा फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मन जिंकत आहे. आई आणि मुलाचा हा गोंडस फोटो पाहून नेटिझन्स त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोनम कपूरच्या या पोस्टवर काही वेळातच एक लाखाहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत. सोनमच्या बाळाला 6 महिने पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनम आणि बिझनेसमन आनंद आहुजा 8 मे 2018 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. मार्च 2022 मध्ये, या जोडप्याने त्यांच्या आयुष्यात एक छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर 20 ऑगस्टला मुंबईत वायूचा जन्म झाला.