संगीतकार श्रवण यांचे करोना संसर्गाने निधन (Musi...

संगीतकार श्रवण यांचे करोना संसर्गाने निधन (Music Composer Shravan Rathod Of Nadeem-Shravan Duo, Passes Away Due To COVID-19)

नदीम-श्रवण या सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनाच्या प्रादुर्भावाने दुःखद निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

श्रवण यांना मधुमेहाचा विकार होता. करोनाचा संसर्ग झाल्याने गंभीर अवस्थेतच त्यांना हॉस्पिटलात दाखल करणयात आले होते.

नव्वदाव्या दशकात नदीम-श्रवण ही संगीतकार जोडी सुमधुर संगीत देण्याबद्दल प्रख्यात झाली होती. आधी काही पौराणिक चित्रपटांना संगीत दिल्यानंतर ‘आशिकी’ या महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपटातील संगीताने ही जोडी प्रख्यात झाली. नंतर साजन, दिल है की मानता नही, दिवाना, फूल और कांटे, राजा हिंदूस्तानी, राजा, धडकन, दिलवाले अशा अनेक चित्रपटांमधील त्यांची गाणी गाजली.

श्रवण हे अतिशय मनमिळाऊ व विनम्र स्वभावाचे होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.