संगीतकार विनोदी भूमिकेत (Music Composer Plays C...
संगीतकार विनोदी भूमिकेत (Music Composer Plays Comedy Role)

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या संगीतानं वेड लावलं अशा अजय-अतुल या जोडीला मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने भुरळ घातली आहे. घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अजय-अतुल हे सुद्धा न चुकता पाहतात. या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते यावेळी गमतीने म्हणाले.

अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं. त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.
अतुल गोगावले पहिल्यांदाच अभिनयाची झलक दाखवणार!
— Sony मराठी (@sonymarathitv) November 17, 2021
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'
सोम.-गुरू., रात्री 9 वा.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra#सोनीमराठी । #SonyMarathi#विणूयाअतूटनाती । #VinuyaAtutNati pic.twitter.com/HZvtonMmV3
“आम्हाला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं,” असं वाटल्याचं अतुल म्हणाला. तेव्हा संगीतकार विनोदी भूमिकेत आल्यानंतर नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नक्की पाहा.