मुंबई क्रूझ ड्रग्स केस : आर्यन खानची मैत्रिण मु...

मुंबई क्रूझ ड्रग्स केस : आर्यन खानची मैत्रिण मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅड्समध्ये लपवून ड्रग्ज् नेले (Mumbai Cruise Drugs Case : Munmun Dhamecha Hid Drugs In Sanitary Pads)

रेव पार्टी प्रकरणात आर्यन खान बरोबरच मुनमुन धमेचा नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी कोण, याची उत्सुकता लोकांना होती. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक व्हिडिओ प्रसारित केला. ज्यामध्ये या पोरीने सॅनिटरी पॅड्‌समध्ये ड्रग्ज्‌ लपवून नेले, हे कळते.

Mumbai Cruise Drugs Case, Munmun Dhamecha, Hid Drugs In Sanitary Pads
Mumbai Cruise Drugs Case, Munmun Dhamecha, Hid Drugs In Sanitary Pads

एनसीबीने सदर व्हिडिओ क्रुझवरील धाडसत्रात बनवला होता. सॅनिटरी पॅड्‌समध्ये कागदाच्या पुड्यांमध्ये ड्रग्ज्‌ कसे लपवले होते, ते त्यात दिसते.

Mumbai Cruise Drugs Case, Munmun Dhamecha, Hid Drugs In Sanitary Pads

मुनमुन न्यायालयीन कोठडीत आहे. ती मॉडेलिंग करते आणि एका खासगी कंपनीत नोकरी करते. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याची ती मूळ रहिवासी आहे. पण बऱ्याच दिवसांपासून ती आपल्या भावासोबत दिल्लीला राहते आहे. तिच्या इन्स्टाग्राम वरील छायाचित्रांमध्ये ती बऱ्याच मान्यवरांमध्ये वावरत असल्याचे दिसते.

Mumbai Cruise Drugs Case, Munmun Dhamecha, Hid Drugs In Sanitary Pads

या रेव पार्टीत लोकांनी आपली अंतर्वस्त्रे, जोडे यामधून लपवून अंमली पदार्थ नेले होते. मुनमुनच्या भावाने सदर व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे.

फोटो / व्हिडिओ सौजन्य : ट्वीटर / इन्स्टाग्राम