मुकेश खन्नाने मुलींबाबत वापरलेल्या झेलक्या शब्द...

मुकेश खन्नाने मुलींबाबत वापरलेल्या झेलक्या शब्दांवरुन ट्रोलर्सनी घेतली त्याची हजेरी ( Mukesh Khanna Is On The Target Of Trollers For Using Filthy Language About Girls)

सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना अनेकदा त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे बरेचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. मुकेश खन्ना आता पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर आहेत. एका यूट्यूब व्हि़डिओमध्ये मुकेश खन्ना यांनी मुलींसंबंधी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला असून त्यांना ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत मुकेश खन्ना बोलत आहेत की, जर एखादी मुलगी एका मुलाला, मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे असे म्हणते तेव्हा ती सामान्य मुलगी नसून धंदा करणारी मुलगी असते. कारण अशा प्रकाच्या गोष्टी सभ्य समाजातील मुलगी करुच शकत नाही. तो त्या मुलींचा धंदा असतो. तुम्ही त्याचा भाग बनू नका. अशा मुलींपासून थोडं लांबच रहा. मुकेश खन्ना यांच्या या विधानाने सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला असून कमेंटमध्ये अनेकजण सॉरी शक्तिमान असे म्हणत आहेत.

तर काहीजण मुकेश खन्नाच्या या वक्तव्यांना चुकीचे ठरवत, जर मुलाने अशी मागणी केल्यास त्याला तुम्ही काय म्हणाल असे विचारले आहे. एका यूजरने कमेंटमध्ये शक्तिमान म्हातारा झाल्यामुळे त्याला वेड लागले आहे असे म्हटले आहे. मुकेश खन्नाचे यूट्यूबवर भीष्म इंटरनॅशनल हे चॅनल आहे. त्यावर त्यांचे 1.15M सब्सक्राइबर्स आहेत. कोणत्या मुलींपासून दूर रहावे याबाबत त्यांनी  एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावर रॅकेट चालू असून त्यात मुलींच्या प्रोफाइलवरुन मेसेज येतात व काही काळाने ते ब्लॅकमेल करतात. पुढे ते म्हणाले की मला सुद्धा व्हॉटस् अपवर असे मेसेज आले होते. ज्यात त्या  मुलीने मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हटले. जर अशा मुली समाजात असतील तर समजून जा की तो समाज किती खालच्या पातळीचा आहे.