राखी सावंतच्या आईच्या उपचारासाठी मुकेश अंबानींच...

राखी सावंतच्या आईच्या उपचारासाठी मुकेश अंबानींचा मदतीचा हात पुढे, अभिनेत्रीने केला खुलासा (‘Mukesh Ambani Ji Is Helping With My Mom’s Treatment’, Reveals Rakhi Sawant)

राखी सावंत सध्या आपला प्रियकर आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे राखीची आई पुन्हा एकदा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर आली. त्यावेळी तिच्या आईच्या आजारपणाविषयी समजले. राखीच्या आईने आधीच कॅन्सरवर मात केली आहे पण आता तिला ब्रेन ट्युमर झाला असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Rakhi Sawant reveals 'Ambani Ji' is helping with her mother's treatment.  Here's what she said

राखीने सांगितले की तिची आई काही खात-पीत नव्हती आणि ती कोणाला ओळखूही शकत नव्हती. तिच्या आईच्या अर्ध्या शरीराला अर्धांगवायू झाला आहे. याबाबत राखीने खुलासा केला की, मला मुकेश अंबानींचे आभार मानायचे आहेत, ते मला उपचारात मदत करत आहेत. हॉस्पिटलमध्ये माझ्या आईवर जे उपचार चालू आहेत ते फारच महाग आहेत पण मुकेश अंबानी यांनी ते उपचार कमी किंमतीत आम्हाला उपलब्ध करुन दिले.

राखीने असेही म्हटले आहे की, ही केवळ पैशाची बाब नाही, तर मला चाहत्यांना सांगायचे आहे की त्यांनी माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थनाही केली.

याआधी आदिल हे लग्न मान्य करत नसल्याची राखी नाराज होती, मात्र सलमान खानने समजावून सांगितल्यानंतर आता आदिलने पुढे येऊन राखीसोबतचे लग्न मान्य केले आहे.