वेगळा लूक असलेली मुग्धा गोडबोलेची आव्हानात्मक भ...

वेगळा लूक असलेली मुग्धा गोडबोलेची आव्हानात्मक भूमिका (Mugdha Godbole Accepts A Challenging Role With Different Look)

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. लवकरच मालिकेतील अपूर्वाच्या आईची एण्ट्री होणार आहे. अभिनेत्री मुग्धा गोडबोले अपूर्वाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. मुग्धा उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र लेखिका म्हणूनही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुग्धा सध्या स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेचं संवाद लेखनही करत असून तिच्या लेखनाचं कौतुक होत आहे.

Mugdha Godbole
Mugdha Godbole

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना ती म्हणते, ‘ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. अंजली वर्तक असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. माझ्या येण्याने मालिकेत खळबळ उडणार आहे. अशा प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला खूप कमी येतात. आतापर्यंत मी मालिकांमध्ये खूप सोज्वळ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे हे पात्र साकारणं नवं आव्हान असणार आहे. माझा लकूही खूप वेगळा आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत सर्वच कलाकार दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येतेय.’ अशी भावना मुग्धा गोडबोले यांनी व्यक्त केली.’ अपूर्वा वर्तकच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार आहे हे मालिकेच्या पुढील भागांत पाहायला मिळेल.