मृणाल ठाकूरचा बिकिनीतला फोटो पाहून यूजरने विचार...

मृणाल ठाकूरचा बिकिनीतला फोटो पाहून यूजरने विचारले कपडे चोरी झाले का ?(Mrunal Thakur Released Hot Photo In Bikini : Trollers Commented Your Clothes Are Stolen Or What ? )

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिचा बिकिनीमध्ये पोज देतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पण त्या फोटोमुळे मृणालला लोकांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मृणालने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. मृणालने 2018 मध्ये ‘लव सोनिया’ या चित्रपटातून तिच्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली होती. ती सोशल मीडियावरपण खूप अॅक्टिव्ह असते.

मृणालला तिच्यात झालेला बदल दाखवायचा होता त्यासाठी तिने फोटोंची एक सिरीज शेअर केली. त्यातील एका फोटोत मृणालने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते. पण सोशल मीडियावर काही यूजर्सना तिचा हा लूक आवडलेला नाही. पण मृणालने त्या ट्रोलिंगकडे लक्ष दिलेले नाही.

तिच्या फोटोवर एका युजरने लिहिले, ‘लाज नाही, शरम नाही ‘तर दुसऱ्या एका युजरने ‘कपडे चोरी झाले का ?‘ असे कमेंटमध्ये विचारले. तर आणखी एका युजरने ‘बॉलिवूडमधील एण्ट्रीचा परिणाम’ असे म्हटले आहे.

मृणालने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या शरीराच्या आकारामुळे तिला खूप लाज वाटायची.तिला कमरेखालच्या भागाचे वजन कमी करण्यास सांगितले होते. पण एकदा अमेरिकेतल्या एका व्यक्तीने तिला  ‘किम कार्दशियन’ सारखी दिसते अशी कमेंट केली होती त्यामुळे ‘’लोक जेव्हा माझ्या फिगरकडे बघून मडके असे टिप्पणी देतात किंवा मला वाईट वाटेल असे काहीतरी बोलतात तेव्हा खरेतर मला काहीच फरक पडत नाही. मला त्याचा गर्व वाटतो.’’ असे मृणालने सांगितले. तिने पुढे सांगितले की आता माझ्यात फोटो पोस्ट करण्याचा आत्मविश्वास आला आहे. मृणालच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सीता रामम या चित्रपटात दिसणार आहे.