पॉप स्टार बादशहाचे नवे पार्...

पॉप स्टार बादशहाचे नवे पार्टी स्टार्टर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ मध्ये मृणाल ठाकूरचा सेक्सी अंदाज (Mrunal Thakur Flaunts Her Sexy Look In Pop Star Badshah’s New Party Starter)

ग्लोबल पॉप स्टार बादशहा हा त्याच्या पार्टी ट्रॅकसाठी ओळखला जातो. त्याचे पार्टी ट्रॅक तरुणवर्गाला खूप आवडतात. या रॅपरचे मागील सिंगल ‘गेंदा फूल’ अव्वल क्रमांकावर असून त्याला ८५० दशलक्ष व्ह्यूज मिळाले, यावरून त्याच्या अतीव लोकप्रियतेची कल्पना येईल.

Mrunal Thakur Flaunts Her Sexy Look

याच बादशहाचे नवे पार्टी स्टार्टर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ सोनी म्युझिकवर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यामध्ये बादशहाचा सिग्नेचर स्वॅग, सोजेशे चटपटीत शब्द, निखिताचा नशिला आवाज आणि थिरकायला लावणारे संगीत यामुळे हे पार्टी स्टार्टर धमाल करणार आहे, असा होरा आहे.

Mrunal Thakur Flaunts Her Sexy Look

‘बॅड बॉय x बॅड गर्ल हे नाचायला भाग पाडणारे, खेळकर गाणे असून ती मस्तीत रंगलेली, मर्यादा ओलांडायला लावणारी धमाल आहे,’ असे बादशहा म्हणतो. फरहान अख्तर सोबत ‘तुफान’ मध्ये दिसलेल्या मृणाल ठाकूरचा हा पहिलाच म्युझिक व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तिचा जबरदस्त सेक्सी लूक पाहायला मिळतो. ‘या गाण्यातील माझा लूक आणि कामगिरी प्रेक्षकांना थक्क करील. बादशहासोबत शुटींगचा आनंद निराळा होता,’ असं मृणाल ठाकूरने सांगितलं.