शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप करणे मिसेस मानकताल...

शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप करणे मिसेस मानकताला पडले महागात, युजर्स म्हणाले हिला चांगली अद्दल घडवा (Mrs. Mankata Is Trolled Over The Allegations On Shiv Thackeray For Stealing Clothes : Users Demand To Teach Her A Lesson)

बिग बॉस १६च्या घरात तीन आठवड्यांपूर्वी दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या. ज्यामध्ये याच सिजनमधून एव्हीक्ट आलेली श्रीजिता डे आणि नवा स्पर्धक विकास मानकताला एंटर झाला होता. यानंतर तिसऱ्या आठवड्यात विकास नॉमिनेट झाला आणि एलिमिनेटसुद्धा. घरात आल्यापासून तो शिव ठाकरेच्या हात धूवुन मागे लागला होता. त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात वाईट विचार भरवण्याचा प्रयत्न तो सतत करत असल्याचे युजर्स म्हणत होते. त्यासाठी त्याला सोशल मीडियावर खूपदा ट्रोलही केले गेले. शोमधून आऊट झाल्यावरपण त्याने शिवचा पाठलाग काही सोडला नाही. माध्यमांसमोरही अनेकदा त्याने शिवला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यापुढे कधीच त्याचे तोंडही पाहणार नसल्याचे तो म्हणाला. आता या वादात विकासच्या पत्नीनेही उडी घेतली आहे. त्याच्या बायकोने शिववर विकासचे कपडे चोरी केल्याचा आरोप केला होता. पण तिचा आरोप तिलाच भारी पडल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर विकास व त्याच्या पत्नीला प्रचंड प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तसेच शिवच्या चाहत्यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विकास घरातून बाहेर पडल्यावर त्याची पत्नी गुंजन मानकतालाने शिवला कपडेचोर म्हटले होते. वीकेंड का वार एपिसोडमध्ये शिव ठाकरेने घातलेला फ्लोरल कोट हा विकासचा असून त्याने चोरला असल्याचा आरोप तिने केला होता. तिने ट्विट करून शिवकडे ते कपडे परत मागितले होते.

पण नंतर विकासचे हरवलेले कपडे सापडल्याने गुंजनची बोबडी वळाली. कपडे चोरले असा कांगावा करत तिने कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली ​​होती. पण सत्य बाहेर आल्यावर तिने हे ट्विट डिलीट केले आणि एकदम चिडीचूप झाली. यानंतर आता शिव ठाकरेचे कुटुंब, मॅनेजर आणि चाहत्यांनी या मानकताला दांपत्याची शाळा घेण्यास सुरुवात केली.

शिव ठाकरेच्या टीमने त्याच्या कुटुंबाकडून एक निवेदन जारी केले. त्या निवेदनात मानकताला दाम्पत्याने शिववर अपमानकारक आरोप केल्याचे म्हटले आहे. तसेच ‘विकासची पत्नी शिवबद्दल वाईट बोलली आहे. यामुळे शिवचे चाहते आणि कुटुंबीयांना खूप त्रास झाला. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. संपूर्ण प्रकरण जेव्हा आम्हाला कळेल, तेव्हा आम्ही प्रत्युत्तर देऊ’ सोबतच कायदेशीर कारवाईदेखील करण्याचा इशारा त्यांनी मानकताला दांपत्याला दिला आहे. शिवची एक किंवा दोन नव्हे तर तीन स्टायलिस्टची टीम आहे. जी त्याला शोमध्ये वेळोवेळी कपडे, शूज आणि इतर आवश्यक गोष्टी पाठवत आहे. जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची कपड्याची कमी पडणार नाही.’असेही या निवदनात सांगण्यात आले आहे.