‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट...

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर रिलीज : सत्य घटनेवर आधारित अंगावर काटा आणणारं कथानक (Mrs Chatterjee Vs Norway Official Trailer)

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लक्ष वेधून घेणारा आहे. राणी मुखर्जीचा दमदार अभिनय यात बघायला मिळतोय. हा चित्रपट २०११ मधील नॉर्वेतील प्रसिद्ध प्रकरणावर आधारित आहे. त्यात भारतीय दाम्पत्याला त्यांच्या मुलांपासून वेगळे केले जाते.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा या चित्रपटाची कथा एक आई तिच्या मुलांसाठी देशाविरुद्ध त्यांच्या कायद्याविरुद्ध कशी लढते यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये स्थायिक झालेल्या मिसेस चॅटर्जी (राणी मुखर्जी) कडून होते. यात तिचा नवरा हा नोकरी करणारा दाखवण्यात आला आहे. त्या दोघांना दोन मुलं असून एक सुखी कुटुंब दाखवण्यात आले आहे. पण एक दिवस या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागावी अशी घटना घडते.

मुलांचे संगोपण योग्य पद्धतीने करत नसल्याचे कारण देत नॉर्वे सरकारकडून या दाम्पत्याची मुले घेतली जातात. मग आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी या पती-पत्नीने दिलेल्या लढ्याचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. मिसेस चॅटर्जी हार मानणार नाहीत. ती तिच्या आणि तिच्या मुलांच्या हक्कांसाठी नॉर्वे आणि भारतातील न्यायालयांमध्ये जाते. चित्रपटात राणी मुखर्जीने मुख्य भूमिका साकारली आहे. राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.

आशिमा छिब्बर यांनी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी हा चित्रपट ३ मार्च २०२३ ला रिलीज होणार होता पण नंतर त्याची रिलीज डेट बदलून १७ मार्च २०२३ करण्यात आली. याआधी राणी २०२१ मध्ये आलेल्या बंटी और बबली या चित्रपटात झळकली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी राणी या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहे.