सीमेवरील जवानांच्या ऑक्सिजनसाठी चितळे दांपत्यान...

सीमेवरील जवानांच्या ऑक्सिजनसाठी चितळे दांपत्याने आपले सर्व दागिने विकले (Mr. And Mrs. Chitale Sold Their Entire Jewellery For Army Soldiers Oxygen Supply: Couple Honoured By PM Narendra Mody)

सोबतच्या फोटोमध्ये श्री. व सौ. योगेश आणि सुमेधा चितळे हे दांपत्य पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्याकडे आलेले दिसत आहेत. परंतु ते पंतप्रधानांची कोणतीही मदत मागण्यासाठी आलेले नसून, त्यांनी आवर्जून भेटीस बोलावले म्हणून आलेले आहेत. पंतप्रधानांनी चितळे दांपत्यांनी केलेल्या सत्कृत्याबद्दल त्यांना सन्मानित केले.
कारण पुण्याच्या या उदार दांपत्याने मोठी कामगिरी केली आहे. सियाचेन या भारताच्या सीमेवरील हॉस्पिटलात लष्करी जवानांना प्राणवायूचा पुरवठा व्हावा म्हणून चितळे पती-पत्नी यांनी आपले सर्व सोन्याचे दागिने विकून १कोटी २लाख रुपये सहृदयतेने दिले आहेत. समुद्रसपाटी पासून खूप उंचावर असलेल्या या सीमाभागात आपले शूर जवान पहारा देत असतात. संरक्षण करत असतात. त्यांना या बर्फाळ भागात प्राणवायूची आवश्यकता असते. भारत सरकारने तिथे प्राणवायूचा पुरवठा केला आहे. त्यात भर टाकून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना अधिक प्राणवायू मिळावा म्हणून चितळेंनी हे औदार्य दाखवले आहे. त्यामुळे सियाचेन विभागात तैनात असलेल्या २० हजार जवानांना प्राणवायूची मदत लाभली आहे.
पंतप्रधानांनी चितळे दाम्पत्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना गौरवित केले.

Mr. And Mrs. Chitale, Army Soldiers Oxygen Supply, PM Narendra Mody

(छायाचित्र व माहिती : रंगराजन पार्थसारथी यांच्या सौजन्याने)