लग्नाआधी या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ...

लग्नाआधी या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मौनी रॉय, हिट मालिकेत दोघांनी केले होते एकत्र काम (Mouni Roy Was Once A Fan Of This Famous TV Actor, Both Worked Together In The Hit Serial)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयचे स्टारडम दिवसेंदिवस वाढत आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिने एकापेक्षा एक हिट मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मौनी जितकी सुंदर आहे तितकीच ती हुशार देखील आहे. चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयु्ष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्याची सुद्धा इच्छा असते. तिची चाहत्यांची संख्याही जबरदस्त आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेण्याची सुद्धा इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला मौनी रॉयच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल सांगणार आहोत.

मौनी रॉयही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मौनीच्या आयुष्यातही प्रेमाच्या गोष्टी करणारे अनेकजण येऊन गेले आहेत. पण आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी इतरांपेक्षा खास असते. मौनीच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित रैना. मोहित आणि मौनीने एकमेकांची मनं चोरली होती.

मौनी आणि मोहितने मीडियासमोर कधीच आपले प्रेम उघड केले नसेल तरी एखाद्या कलाकाराची बातमी मीडियाच्या नजरेत कधीच लपत नाही. त्यावेळी या दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या. त्यांची जोडी खूपच क्यूट होती.

दोघांनी ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत एकत्र काम केले होते, या मालिकेत मोहितने महादेवांची भूमिका केली होती आणि मौनीने देवी पार्वतीची भूमिका केली होती. या व्यक्तिरेखांमधील दोघांची जोडी सर्वांनाच आवडली आणि ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचली. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये ही जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले होते.

 या दोघांनी कधीही त्यांच्या अफेअरबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. जेव्हा मौनीला त्यांच्या नात्याबद्दल विचारले जायचे तेव्हा ती त्या नात्याला केवळ मैत्री म्हणायची. पण मोहितचे कौतुक मात्र ती तोंडभरुन करायची. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही 2014 मध्ये लग्न करणार होते, परंतु काही अडचणींमुळे ते लग्न करू शकले नाहीत.

त्याच दरम्यान मौनी आणि मोहित यांना ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र सहभागी होण्याची संधीही आली होती, पण दोघांनीही ती ऑफर नाकारली. दोघांनाही त्यांचे नाते जगासमोर येऊ द्यायचे नव्हते यासाठी त्यांनी ती ऑफर नाकारल्याचे म्हटले जाते. मौनीला मोहितसोबत वेळ घालवणे आवडायचे. अनेकदा त्यांना एकत्र पाहण्यात आले होते.

मोहितला डेट करण्यापूर्वी मौनी रॉय गौरव चोप्राला डेट करत होती. मात्र मोहितला भेटल्यानंतर अभिनेत्रीने गौरवपासून दूर राहणे पसंत केले. वर्षानुवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांचे ब्रेकअप कशामुळे झाले ते अजूनही कळलेले नाही. पण दोघांनीही आपापला वेगवेगळा संसार थाटला आहे.