शुभ्र वस्त्रात, पिवळ्या फुलांचा वर्षाव झेलत असल...

शुभ्र वस्त्रात, पिवळ्या फुलांचा वर्षाव झेलत असलेली मौनी रॉय दिसतेय् अतिशय सुंदर (Mouni Roy Shares Unseen Pics From Her Haldi Ceremony)

नववधू मौनी रॉयने आपल्या लग्नाच्या आल्बमचे छान छान फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये मौनी व तिचा नवरा सूरज नांबियार यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले आहेत.

या छायाचित्रांमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसते आहे. पांढऱ्या शुभ्र ड्रेसला शोभतील असे जडाव तिनं घातले आहेत. तिनं मांग टिका आणि कानात फुलांचे दागिने घातले आहेत.

मौनी आणि सूरज झेंडुच्या पिवळ्या फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघाले आहेत. व्हिडिओत मौनी आनंदाने हसते आहे, लाजते आहे. तिच्या सोबत तिची जिवलग मैत्रिण मंदिरा बेदी पण खूपच खुश दिसते आहे.

सूरज पण फुलांच्या वर्षावात आनंदाने हसतो आहे. दोघांनी रोमॅन्टिक पोझेस दिल्या आहेत. हळदी समारंभाचे हे क्षण असून त्याला देण्यात आलेली फुलांची जोड फार छान दिसते आहे. हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.