मौनी रॉयचे व्हाइट ड्रेसमधील आकर्षक फोटोज; ट्रोल...

मौनी रॉयचे व्हाइट ड्रेसमधील आकर्षक फोटोज; ट्रोलर्स म्हणताहेत, श्रीमंत लोक पॅन्टीवर देखील बेल्ट वापरतात… (Mouni Roy Shares Stunning Pictures In White Dress, Gets Hilariously Trolled For This Reason)

रुपवान नागिन मौनी रॉय (nagin fame Mouni Roy) ची हॉटनेसच्या बाबतीत कोणीच बरोबरी करू शकत नाही. तिचे ग्लॅमरस रुप चाहत्यांना घायाळ करते. मौनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने चाहत्यांसाठी शेअर केलेले तिचे लेटेस्ट फोटो सध्या इंटरनेटवर आग लावत आहेत.

मौनीने वेगळ्याच आउटफिटमधले बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. खरं तर दिसायला तो व्हाइट ड्रेस दिसतो परंतु त्याच्या स्टाइलिंगमध्ये थोडा ट्वीस्ट आहे. मौनीचा हा वन शोल्डर शीयर लेसी ड्रेस आहे. यासोबत तिने ब्ल्यू रंगाची इनर वेअर घातली आहे. तिच्या हाय वेस्ट पॅन्टीला तिने व्हाइट बेल्ट लावला आहे.

मौनीच्या या फोटोंवर चाहते भरघोस कमेंट करत आहेत. ती ब्यूटी क्वीन आणि हॉटेस्ट असल्याचे म्हणत आहेत. काही नेटकरी म्हणताहेत, मौनी सारखी नागीन असेल तर प्रत्येक जण तिच्याकडून स्वतःला दंश करुन घेईल. तर काही लोकांना तिची ही स्टाइल पसंत पडलेली नाही. ते म्हणताहेत, हा असा कसा ड्रेस आहे…? काही जण तिची खिल्ली उडवत आहेत, पॅन्टीसोबत कोणी बेल्ट लावतं का? असं विचारत आहेत. ही फॅशन अशी कशी? हे श्रीमंत लोक चड्डीवर सुद्धा बेल्ट लावतात, अशाही कमेंट्‌स लोक करत आहेत.

यापुढे जाऊन एक नेटकरी म्हणतोय, एक वेळ अशी होती जेव्हा मौनीला बिकिनीमध्ये बघण्यासाठी आम्ही आतुरलेले असायचो आणि आज मौनी नेहमीच बिकिनीत दिसते. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, मौनी तू अंगप्रदर्शन करू नको, आम्हाला तुला सामान्य कपड्यांत पाहायला आवडतं, असं म्हटलं आहे.

मौनीच्या या लूकवर काही चाहते असेही म्हणत आहेत की, आम्हाला तुझे सुंदर मोकळे केस आणि निळ्या रंगाची पॅन्टी आवडली… मौनीने फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन इअर रिंग्ज घातल्या आहेत. परंतु लोकांची तिच्या पॅन्टीवरून नजरच हटत नाहीये.. खास करून तिने त्यावर लावलेला बेल्ट… सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.