मौनी रॉयने शेअर केले भगव्या मिनी ड्रेसमधले फोटो...

मौनी रॉयने शेअर केले भगव्या मिनी ड्रेसमधले फोटो, युजर्स म्हणाले- रंग बघून कपडे घालत जा(Mouni Roy Shares New Pictures In Short Orange Dress From Abu Dhabi Holiday, Fans Say- Madam Colour Toh Dekh Kar Pahna Karo, Aapko Pata Nahi Kya Ye ‘Bhagwa Rang’ Hai)

सध्या मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत यूएईमध्ये सहलीचा आनंद घेत आहे. अभिनेत्री एकामागून एक हॉट लूकमध्ये पोज देत आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. मात्र लोक तिला त्यावरुन सतत ट्रोल करत आहेत. अलीकडेच मौनीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्‍ये समुद्रकिना-यावरील एक फोटो शेअर केला होता,  त्यावर लोक सतत कमेंट करत होते की हिला कोणीतरी खायला द्या, तिची अवस्था बघा, ती तारुण्यात साठ वर्षांची दिसतेय…

यानंतर मौनीने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले, तेव्हाही लोक म्हणू लागले की मम्मींला सांग कॉम्पॅक्स दे. तर अनेक जण तिला हॉट आणि सेक्सी म्हणत तिचे कौतुक करत आहेत. बहुतेक जण तिच्या बारीक दिसण्यावरुन कमेंट करत आहेत.

आता अभिनेत्रीने आपले ताजे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र यावेळी तिला एका वेगळ्या गोष्टीसाठी ट्रोल केले जात आहे. या फोटोंमध्ये मौनीने केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. मौनीने अतिशय मादक पोज दिली आहे, पण लोक तिला कमेंटमध्ये रंगाबाबत इशारा करत आहेत की मॅडम, तो रंग पाहा आणि मग घाल, तुला माहित नाही का तो भगवा रंग आहे ते.. दुसर्‍या युजरने लिहिले – भगवा रंग, त्याचा अपमान झाला आहे.

काही युजर्स तिच्या उंचीवरुन कमेंट करत आहेत, तर काहींनी पिक्चर क्लिक करण्याची एवढी घाई होती की बॅगही नीट ठेवता आली नाही, असे म्हणत आहेत. काहीजण तिला वजन वाढवण्याचा सल्ला देत आहेत.

याआधीही मौनीने पती सूरज नांबियारसोबत याच ड्रेसमध्ये रोमँटिक पोज देऊन फोटो पोस्ट केले होते, ते चाहत्यांना खूप आवडले होते. पण त्यावेळी काही लोक भगव्या रंगाचा अपमान करत असल्याच्या कमेंट करताना दिसले.

पठाणच्या बेशरम रंग या गाण्यावर दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकिनीवरून बराच वाद आणि राजकारण झाले मात्र लोक कमेंट करून खूप एन्जॉय करत आहेत, त्यामुळे तो लोकांच्या गमतीचा विषय बनला आहे.