नववधू मौनी रॉयने सौभाग्याचा चुडा आणि मेंदी दाखव...

नववधू मौनी रॉयने सौभाग्याचा चुडा आणि मेंदी दाखवत बीचवरील काही फोटो केले शेअर, चाहत्यांनी फोटोंवर भरभरून व्यक्त केले प्रेम (Mouni Roy Shares New Pics Flaunting Bridal Chudi And Mehandi, Fans Shower Love On New Bride)

टी. व्ही. वरील अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर सोशल मीडियावर सतत सक्रीय दिसू लागली आहे. बराच काळ बॉयफ्रेंड असलेल्या सूरज नांबियार सोबत २७ जानेवारीला तिनं लग्न केलं. त्यांनतर सातत्याने ती त्यांचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. काश्मीरला हनीमुनसाठी गेलेल्या मौनीने तेथील फोटोही शेअर केले होते, जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.

आता मौनी हनीमुन आटोपून परत आली आहे आणि पती सूरज नांबियारसोबत काही वेळ घालवत आहे. दरम्यान तिने आणखी काही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंत डीप बॅक नेक ड्रेस घालून ती बीचच्या किनारी उभी असलेली दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

मौनीने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नववधू आपल्या सौभाग्याचा चुडा शाखा पोला आणि हातावरील मेंदी दाखवताना दिसत आहे.

या सगळ्याच फोटोंत मौनी अतिशय सुंदर दिसत असून नववधूचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तिने या फोटोंसोबत कॅप्शन लिहिली आहे,  “Of Sonnets sunsets & my shaakhaa pola. Made by my dearest ???? ”

मौनी रॉयच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. मौनीचा सहकलाकार अर्जुन बिजलानीने तिच्या या पोस्टवर हार्टचा इमोजी पाठवला आहे, तर आश्का गोराडियाने लिहिलंय – “लग्नानंतरची पहिली संध्याकाळ. एकदम परफेक्ट. आम्ही सर्व, बीच आणि गोल्डन सन.”

मौनीच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच ती अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे.