ऑलिव ग्रीन रंगाच्या शर्टाचे बटण काढून मौनी रॉयन...
ऑलिव ग्रीन रंगाच्या शर्टाचे बटण काढून मौनी रॉयने केले बोल्ड फोटोशूट (Mouni Roy Looks Stunning In An Unbuttoned Olive Green Shirt For A Bold Photoshoot)

By Anita Bagwe in मनोरंजन
मौनी रॉयने आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. तिचे हे धाडसी फोटोशूट पाहून चाहते चक्रावले आहेत.

टेलिव्हिजन ते चित्रपटसृष्टी अशा असा यशस्वी प्रवास करणारी ३५ वर्षांची मौनी रॉय आता डिजिटल मीडियाची सुपरस्टार झाली आहे. तिचा या मंचावर वावरच असा आहे की, चाहते आणि प्रशंसक फिदा होतात.

अलिकडेच तिने जे बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्यामध्ये ती ग्लॅमरस् दिसते आहे. तिची ही अदा सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे.
या फोटोसोबत मौनीने ‘लिव्ह द मिस्टरी, डोन्ट ट्राय टू सॉल्व इट्’ असा मजकूर प्रसारित केला आहे.

या गरमागरम फोटोंमध्ये मौनीने ब्लू डेनिम रिप्ड जीन्स आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शर्ट घातला आहे. शर्टाचे बटण काढून मौनीने अधिक धाडसी लूक दिलं आहे.
मौनीचा मेकअप अतिशय साधा आहे. नॅचरल लूकसह तिने स्मोकी आय मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत.