मौनी रॉयचे गोल्डन ड्रेसमधील फोटो व्हायरल, जिकडे...

मौनी रॉयचे गोल्डन ड्रेसमधील फोटो व्हायरल, जिकडे तिकडे सुंदर नागिनीची चर्चा… (Mouni Roy Looks Mermaid In This Golden Outfit)

मौनी रॉय तिच्या आकर्षक लूक आणि अप्रतिम पेहरावासाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. खाण्यापिण्याची शौकीन असलेली मौनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील तिच्या प्रवासाचे फोटो अतिशय सुंदर पद्धतीने शेअर करते.

आज तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोल्ड स्टाइलमध्ये जलपरीसारखा लूक शेअर केला आहे. तिच्या सौंदर्याची जादू लोकांवर आधीच आहे, अन्‌ आताची तिची ही स्टाईलही चाहत्यांना खूप आवडली आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने आनंद व्यक्त केला आहे. काहींनी जबरदस्त कमेंट दिल्या आहेत. एका चाहत्याने तर म्हटले की, ही नागीण डसली तरी मरण आनंददायी असेल… काहींनी तिला गॉर्जियस म्हटले आहे तर काहींनी सुंदर जलपरी म्हटले आहे.

मौनी रॉय या गोल्डन कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे आणि तिची किलर स्टाइल अनेकांना घायाळ करत आहे. तिचे हे फोटो लोकांनी प्रचंड पसंत केले असून ते वेगाने व्हायरल झाले आहेत. ती एका पुलाच्या कडेला अतिशय आकर्षक पद्धतीने उभी आहे आणि कॅमेरा तिच्या जवळ आल्यावर ती तिच्या कजरारे नैनांनी मागे वळून पाहते. ओह.. ओह… तिची ही अदा लोकांना वेड लावायला पुरेशी आहे. या ड्रेसमध्ये ती पायऱ्यांवर स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.

फिरणे, पार्ट्या करणे, तिचा गाण्याचा अल्बम यामुळे सध्या मौनी खूप चर्चेत आहे. विशेषत: गायक जुबिन नौटियालसोबत तिचे दिल गलती कर बैठा हे गाणे सुपर-डुपर हिट ठरले आहे. मौनी आता अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तिची नकारात्मक भूमिका आहे.

मौनीने एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. यातील तिची सतीची भूमिका सर्वांनाच आवडली. यानंतर नागिन १, नागिन २ चीही खूप प्रशंसा झाली. मौनीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

खाण्यासोबतच मौनीला नाचण्याची आणि पुस्तके वाचण्याचीही खूप आवड आहे. ती अनेकदा उत्तमोत्तम लेखकांची पुस्तके वाचत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे कोट्स शेअर करत असते. नुकतेच गोव्यात तिने आपल्या मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले. सगळ्यांची मस्त पार्टी झाली. तिला मित्रांसोबत मजा करायला आवडते. ती अनेकदा त्यांच्यासोबतचे खोडकर फोटो शेअर करत असते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम