‘तुमच्या कामात मातृत्वाचा अडसर येऊ देऊ नका’ : अ...

‘तुमच्या कामात मातृत्वाचा अडसर येऊ देऊ नका’ : अभिनेत्री सई देवधरचा स्त्रियांना सल्ला (“Motherhood Should Not Be A Barrier To Your Career”: Actress Sai Deodhar’s Advice To Women)

कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वेगळी नोकरी करण्याचा किंवा कामाचा ताण कमी करण्याचा विचार तीनपैकी एका स्त्रीने केलेला असतो, हे तुम्हाला माहीत होते का? आई झाल्यानंतर, करिअर व कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात तोल साधणे कठीण होऊ शकते. कोविड साथीमुळे पुरुषांच्या तुलनेत बहुतांशी स्त्रियांना काम सोडावे लागले, हे सत्य आहे. उडान व सारा आकाश यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोंमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई देवधर हिने या समस्येची दखल घेतली. तसेच खंडानंतर स्त्रियांना काम पुन्हा सुरू करणे सोपे नसते पण ते अशक्यही नसते असे तिला कळून चुकले!

स्त्रियांना खंडानंतर काम पुन्हा सुरू करण्यास मदत करणे, उत्तेजन देणे व प्रेरणा देणे यांसाठी सईने स्त्रियांसाठीचे सोशल कम्युनिटी अॅप असलेल्या कोटोवर बॅकटूवर्क ही कम्युनिटी तयार केली आहे. येथे ती आपले अनुभव शेअर करू इच्छिणाऱ्या स्त्रियांसोबत संवाद साधणार आहे आणि पुन्हा काम सुरू करण्यासाठी स्त्रिया एकमेकींना सहाय्य करणार आहेत. ही कम्युनिटी काम पुन्हा सुरू करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्याचे व त्यांवर उपाय शोधण्याचे स्थळ म्हणून काम करेल तसेच काम व आयुष्य यांच्यात समतोल कसा राखायचा यावरही येथे चर्चा होईल.

मातृत्वाला प्राधान्य देऊन कामापासून दूर राहणे कसे असते याचा सई देवधरला प्रत्यक्ष अनुभव आहे. तिचे मूल मोठे होत असताना तिने चार वर्षे काम बंद ठेवले होते. मात्र, कामावर असलेल्या प्रेमामुळे ती सेटवर परत आली – केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एक लेखिका, फिल्ममेकर व निर्माती म्हणूनही तिने काम केले! तिला आपल्या आवडीचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी तिच्या नवऱ्याने व कुटुंबाने अविश्वसनीयरित्या पाठिंबा दिला, हे सई मान्य करते आणि हा पाठिंबा प्रत्येक स्त्रीला मिळेलच असे नाही याचीही तिला कल्पना आहे. मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यात मग्न असताना स्त्रियांनी स्वत:ला विसरू नये व आपली क्षमता खऱ्या अर्थाने उपयोगात आणावी असे सईला वाटते.