श्रीदेवीने जान्हवी कपूरच्या बाथरूमला लॉक लावून ...

श्रीदेवीने जान्हवी कपूरच्या बाथरूमला लॉक लावून दिले नव्हते…. कारण ऐकाल तर थक्क व्हाल (Mother Sridevi Did Not Allow Janhvi Kapoor To Lock The Bathroom Door, You Will Be Shocked To Know The Reason)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या जान्हवी आपल्या ‘मिली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नसला तरी जान्हवीच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जान्हवीला पाहून सगळ्यांना तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आठवते. नुकतेच एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, तिच्या आईने माझ्या बाथरूमला लॉक लावले नव्हते. यामागचे कारणही खूपच मनोरंजक आहे.

अलीकडेच जान्हवीने आपली आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पहिले घर दाखवले आणि त्याबद्दल बरेच काही शेअर केले. दरम्यान, जान्हवीने सांगितले की, “या घराशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. याची आणखी एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे हे खूप जुने आहे आणि थोडे नवीन सुद्धा. घरातील लहान लहान गोष्टी विशेष आहेत. जसे की माझ्या खोलीमधल्या बाथरूमच्या दाराला लॉक नाही.

जान्हवीने सांगितले, “मला आठवते की माझ्या बाथरुमच्या दरवाजाला आईने लॉक लावण्यास नकार दिला होता. कारण तिला भीती वाटत होती की मी बाथरूममध्ये जाऊन मुलांसोबत बोलत बसेन. म्हणूनच मला माझ्या बाथरूमला लॉक लावण्याची परवानगी नव्हती. आजही या बाथरूमला लॉक नाही.

जान्हवी कपूरच्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच तिचा ‘मिली’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सनी कौशल मुख्य भूमिकेत होता. आता लवकरच जान्हवी नितेश तिवारीच्या ‘बवाल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन दिसणार आहे. याशिवाय जान्हवी ‘मिस्टर अॅण्ड मिसेस माही’ या चित्रपटातही दिसणार आहे, त्यात ती एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.