सासू-सुनांची गोडीगुलाबी : करताहेत एकत्र नाच-गाण...

सासू-सुनांची गोडीगुलाबी : करताहेत एकत्र नाच-गाणे (Mother-In-Law And Daughter-In-Laws Of Serial Dancing Together : A Rare Occassion)

कौटुंबिक मालिकेतील सासू-सुना यांचे काम एकमेकींना शह-काटशह देण्याचे असते. पण याच सासुबाई व सुनबाई एकत्र येऊन नाच-गाणे सादर करतात, तेव्हा त्याचे अप्रुप वाटते. सासू-सुनांचा धमाकेदार परफॉर्मन्स ही यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची खासियत असणार आहे. या सोहळ्यात सासू- सुनांचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे.

या सोहळ्यात सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी-माई, रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा-सौंदर्या, अबोली मालिकेतील अबोली-रमा आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती-अनघा या सासू-सुनांच्या जोड्या धमाकेदार गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

या सोहळ्यात कोणत्या सदस्यांना पुरस्कार मिळणार याचं कुतूहल देखील आहे. त्यामुळे यंदाच्या या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, हे निश्चित.