लोकप्रियतेचे उच्चांक मोडणारी ‘रामायण̵...

लोकप्रियतेचे उच्चांक मोडणारी ‘रामायण’ मालिका आजपासून पुन्हा सुरू (Most Popular Serial ‘Ramayan’ Is Back On Television)

एकेकाळी लोकप्रियतेचे उच्चांक मोडणारी ‘रामायण’ ही मालिका राम नवमीच्या मुहूर्तावर आजपासून पुन्हा सुरू होत आहे. स्टार भारत या चॅनलवर आज संध्याकाळी ७ वाजता या मालिकेचे पुनःप्रसारण होत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

देशभरात करोना महामारीची दुसरी भयंकर लाट आली आहे. सर्वसामान्य लोकांबरोबरच टी.व्ही. स्टार, सिनेस्टार, राजकारणी मंडळी आणि डॉक्टर व नर्सेस देखील याच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणेच आताही टाळेबंदीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कडकडीत लॉकडाऊन होता तेव्हा दूरदर्शनने ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रक्षेपित केली होती. आणि या मालिकेने पुन्हा लोकप्रियतेचा विक्रम केला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका ८० – ९० च्या दशकात सर्वप्रथम दूरदर्शनवर, रविवारी सकाळी ९ वाजता प्रक्षेपित होत होती. तेव्हा ती इतकी लोकप्रिय झाली होती की, रविवारी सकाळी, तिच्या प्रक्षेपणाच्या वेळात रस्त्यावर संचारबंदी असल्याचे वातावरण दिसायचे. टेलिव्हिजन मालिकांमध्ये सर्वाधिक टी. आर. पी. या मालिकेने मिळवला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रस्तुत ‘रामायण’ मध्ये रामाच्या भूमिकेत अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेत दीपिका व हनुमानाच्या भूमिकेत दारा सिंह हे कलाकार चमकले होते. रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांनी केली होती. मालिकेतील ट्रिक सीन्स ही प्रेक्षकांना मोठी नवलाई वाटली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम