या आहेत हिंदी मालिकांमध्ये गाजलेल्या जोड्या, ज्...

या आहेत हिंदी मालिकांमध्ये गाजलेल्या जोड्या, ज्यांना आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत (Most Popular On-Screen Jodis Of Indian TV Serial)

टीव्ही मालिकेतील काही ऑन-स्क्रीन कपल्स प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. वर्षानुवर्षे चालणाऱ्या हिंदी मालिका प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करतात. या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांशी प्रेक्षक इतके जोडले जातात की ते त्या पात्रांना घरातील सदस्यच मानतात. आम्ही तुम्हाला टीव्ही मालिकांमधील अशाच काही लोकप्रिय जोड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

१) राम कपूर आणि साक्षी तन्वर – मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’

‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी राम आणि प्रियाची भूमिका साकारली होती. जुळत नसतानाही ही जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली होती की प्रेक्षकांच्या मनात त्यांनी सहज स्थान मिळवले. ही एक परिपक्व प्रेमकथा होती, त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी ती स्वतःशी मिळतीजुळती वाटली.

२) करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठी – मालिका ‘ये है मोहब्बतें’

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेने करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठी यांच्या करीअरला मोठ्या उंचीवर नेले. त्यातून त्यांना खूप लोकप्रियताही मिळाली. ‘ये है मोहब्बतें’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त काळ चालणारा यशस्वी शो होता. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून दिव्यांका आणि करण दोघांनाही त्यांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार मिळाले.

6) गुरमीत चौधरी आणि दृष्टी धामी – मालिका गीत- हुई सबसे पराई

‘गीत- हुई सबसे पराई’ या मालिकेत गुरमीत चौधरीने मानसिंग खुराना आणि दृष्टी धामीने गीताची भूमिका साकारली होती. गीत आणि मानसिंग खुराना यांच्या प्रेमाने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि ही जोडी खूप लवकर प्रसिद्ध झाली.

८) मोहनीश बहल आणि कृतिका कामरा – ‘कुछ तो लोग कहेंगे’ मालिका

‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेत मोहनीश बहल आणि कृतिका कामरा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत या जोडप्यामधील वयाचे अंतर दाखवण्यात आले होते, त्यामुळे हा शो खूप लोकप्रिय झाला होता, तसेच मोहनीश बहल आणि कृतिका कामरा या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाले होते.

9) राजीव खंडेलवाल आणि आमना शरीफ – मालिका कहीं तो होगा

‘कहीं तो होगा’ या मालिकेतील राजीव खंडेलवाल आणि आमना शरीफ यांनी सूरज गरेवाल आणि कशिश या भूमिका साकारल्या होत्या. यांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. छोट्या पडद्यावरची ही एक सुंदर रोमँटिक जोडी होती, ज्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या जोडीने दीर्घकाळ प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

13) सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे – मालिका ‘पवित्र रिश्ता’

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. विशेष म्हणजे दोघेही एकत्र काम करताना प्रेमात पडले होते. नंतर दोघे वेगळे झाले असले तरी मानव आणि अर्चना ही जोडी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

14) करण मेहरा आणि हिना खान – मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील नैतिक आणि अक्षरा म्हणजेच करण मेहरा आणि हिना खान ही जोडी प्रत्येकाच्या घरातील आवडती जोडी होती. टीव्ही मालिकेतील या क्यूट कपलला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.