मान्सून स्पेशल डाएट (Monsoon Special Diet)

मान्सून स्पेशल डाएट (Monsoon Special Diet)

– पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाण्यापेक्षा, त्या उकडून किंवा शिजवून खा.
– फळांमुळे शरीरातील ऊर्जा कायम राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात मौसमी फळं आणि भाज्यांचा आवर्जून समावेश करा. रानभाज्या जरूर खा.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– कलिंगड, टरबूज यांसारखी पाण्याचं प्रमाण भरपूर असणारी फळं खाणं टाळा. कारण ही फळं शरीरातील सुजेला कारणीभूत ठरू शकतात.
– मका, काबुली चणे, बेसन यांसारख्या कोरड्या घटकांना आहारात स्थान द्या.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– ब्राउन राइस, ओट्स, सातू यांसारख्या आरोग्यदायक आणि पौष्टिक घटकांचा आहारात समावेश करा.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– दुधाऐवजी दही आहारात घेणं अधिक लाभदायक ठरतं.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– चिंच, टोमॅटो, लिंबू यांसारखी आंबट फळं टाळा.
– या मोसमात बहुतांश लोक जास्त प्रमाणात चहा-कॉफीचं सेवन करतात. थंड वातावरणात गरमागरम चहा किंवा कॉफी पिणं छान वाटत असलं, तरी त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. शरीर डिहायड्रेट होऊ लागतं. त्यामुळे चहा- कॉफी प्रमाणातच घ्या. चहाचे चाहते असाल, तर हर्बल-टीचा पर्याय निवडा.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. मात्र ते उकळलेलं आणि गाळलेलं असेल, याची दक्षता घ्या.
– पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, म्हणूनच ही शक्ती वाढेल अशा अन्न घटकांचं सेवन करा. जसं की, सुकामेवा, आवळा, मोसंबी इत्यादी.
– कारलं, कडुनिंब आणि हळद यामधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि औषधी गुणधर्म या मोसमात होणार्‍या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात.
– फ्लॉवर, गवार, बटाटा, भेंडी यांसारख्या भाज्या खाणं टाळा.
– सर्दी-खोकला होऊ नये म्हणून, मुळ्याचा ताजा रस प्या.

मान्सून स्पेशल डाएट, Monsoon Special Diet

– तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
– पावसाळ्यात होणार्‍या आरोग्याच्या विविध समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी कोमट पाण्यात सेंधव मीठ आणि पिंपळी एकत्र करून प्या.