मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन-नोरानंतर, श्रद्धा क...

मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन-नोरानंतर, श्रद्धा कपूर-शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे कॉनमॅन सुकेशसोबत संबंध असल्याचे आले समोर (Money Laundering Case : Shilpa Shetty, Shraddha Kapoor Linked With Conman Sukesh, More Bollywood Names Under ED Scanner)

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrashekahr) बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावे समोर आली होती. परंतु, टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंध असल्याचे सांगितले आहे. लवकरच या सेलिब्रिटींनाही चौकशीला बोलावले जाऊ शकते.

एएनआयच्या वृत्तानुसार, सुकेशने आपल्या वक्तव्यात सांगितले आहे की, तो श्रद्धा कपूरला २०१५ पासून ओळखतो आणि एनसीबी प्रकरणात अभिनेत्रीला मदतही केली होती. बाकीच्या सेलिब्रिटींबद्दल बोलताना, सुकेशने ईडीला सांगितले की, तो हरमन बावेजाला ओळखतो आणि तो त्याच्यासोबत त्याचा पुढचा चित्रपट ‘कॅप्टन’ची सह-निर्मिती करणार होता, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुकेशने त्याच्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, पती राज कुंद्राच्या प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीनेही त्याच्याशी संपर्क साधला होता.

मात्र, अहवालानुसार सुकेशने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याआधी ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सुकेशशी संबंधाबाबत चौकशी केली होती. केंद्रीय एजन्सीने सांगितले की, जॅकलिन आणि नोरा यांना आरोपींकडून टॉप मॉडेल लक्झरी वाहनांसह अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

या प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्यापासून अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. अभिनेत्रीला कुठेही जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. या कारणामुळे ती भारताबाहेर जाऊन चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. जॅकलिनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसली होती.

सध्या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात ‘अटॅक’, ‘बच्चन पांडे’, ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ यांचा समावेश आहे. ‘अटॅक’चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्याला खूप पसंती मिळाली. या चित्रपटात जॅकलिनसोबत जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.