निळी बिकिनी घालून निळ्याशार पाण्यातील मोनालिसाच...

निळी बिकिनी घालून निळ्याशार पाण्यातील मोनालिसाच्या मदमस्त फोटोंनी इंटरनेटवर उसळलेला आगडोंब (Monalisa’s Bikini Look Sets Fire In Maldives Waters)

भोजपूरी चित्रसृष्टी आणि टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा इंटरनेटवरील सेन्सेशन आहे. कारण ती आपले मदमस्त करणारे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करत असते. तिथे तिचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या ती आपला नवरा विक्रांत सिंह राजपूत सह मालदीव बेटांवर सुट्टी घालवत आहे. तेथील निळ्याशार पाण्यात, निळी बिकिनी घालून मोनालिसाने पाठविलेल्या मदमस्त फोटोंनी इंटरनेटवर आगडोंब उसळल्यास नवल नाही.

Monalisa's Bikini Look

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Monalisa's Bikini Look

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर मोनालिसाने निळी बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. मालदीव बेटांवरील पाण्यातील हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ते पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

Monalisa's Bikini Look

या ताज्या फोटोंमध्ये मोनालिसा भलतीच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. पाण्यामध्ये पोहत असलेली, ती जणू जलपरीच वाटते आहे. आपल्या मोहक अदा दाखवत तिने कहर केला आहे. अन्‌ चाहत्यांच्या दिलाची धडकन वाढविली आहे. कारण चाहत्यांनी तिला भरपूर लाईक्स व कमेंटस्‌ देऊन आपल्या अवस्थेची पावती दिली आहे.

Monalisa's Bikini Look

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बिकिनीतील फोटोंबरोबरच मोनालिसाने आपला नवरा विक्रांत सिंह राजपूत याच्यासह काढलेले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते दोघे पाण्यातील राजेशाही ब्रेकफास्ट घेताना दिसत आहेत.

Monalisa's Bikini Look

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याशिवाय शेअर केलेल्या अन्य फोटोंमध्ये ती स्कर्ट आणि रिव्हीलींग टॉट घातलेली दिसत आहे. हाफ ओपन हेअर स्टाईलने तिच्या पेहरावात भर घातली आहे. या फोटोंना देखील चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे.

मोनालिसाच्या कामकाजाबाबत बोलायचं तर, तिने कित्येक भोजपुरी चित्रपटांतून आपली अदाकारी पेश केली आहे. अजय देवगण आणि सुनील शेट्टीसोबत ती ‘ब्लॅकमेल’ मध्ये होती. शिवाय टेलिव्हिजनवर ती गाजली आहेच.