मोनालिसा बागल होणार ऐतिहासिक ‘रावरंभाR...
मोनालिसा बागल होणार ऐतिहासिक ‘रावरंभा’ (Monalisa To Portray Historic Character)

नुकतेच “रावरंभा” या आगामी मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ऐतिहासिक अशा शाहूनगरीतील हा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनालिसा बागलने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमातून मोनालिसा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शंभू महादेवाच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या रायरेश्वराच्या मंदिरात या सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा संपन्न झाला आहे.

या सोहळ्या प्रसंगी प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे, अभिनेत्री मोनालिसा बागल, ‘थोर इतिहासकार भोर’चे दत्ताजी जगदाळे साहेब, उद्योजक मंगेश दादा जाधव, अभिनेत्री अश्विनी बागल, ‘धर्मवीर युवा मंच’चे अध्यक्ष प्रशांत नलावडे, निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांसह संपूर्ण टीम उपस्थित होती.

‘रावरंभा’ या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन प्रताप दादा गंगावणे यांचे असून, अनुपजी जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. तर शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

‘रावरंभा’ या सिनेमातून ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगड्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहेच. चित्रपटात नामवंत कलाकार असून, त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे.