नवीन सिनेमासाठी मोनालिसा बागलने वजन केले कमी (M...

नवीन सिनेमासाठी मोनालिसा बागलने वजन केले कमी (Monalisa Bagal Looses Weight For New Movie, Looks Stunning)

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन संपून आता सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असं वाटत असतानाच यंदाचा लॉकडाऊन सुरू झाला. नवीन वर्षात सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते पण आता सिनेसृष्टीला पुन्हा एकदा ब्रेक लागला. पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे ‘जग थांबलंय’ ही भावना बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे लक्षात आल्यानंतर अभिनेत्री मोनालिसा बागलने आपल्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना संयम राखण्यास सांगितले आहे.

मोनालिसा ही मराठी सिनेमा आणि मालिकांतून अभिनय करणारी गोड अभिनेत्री आहे. कोविड -१९ च्या लॉकडाऊन दरम्यान झी मराठीवर सुरू झालेल्या ‘टोटल झुंबलक’ या मालिकेमुळे मोनालिसा खूपच लोकप्रिय झाली. याआधी तिने झाला बोभाटा, ड्राय डे, सौ शशी देवधर यांसारख्या काही मराठी सिनेमांतून काम केलं आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये मोनालिसाने एका सिनेमासाठी आपले वजन कमी केले होते. आणि आताही लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, योग्य डाएट करून ती कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या फोटोंवरून तिचा फिट ॲण्ड फाइन  लूक लक्षात येतो. वजन कमी केल्यानंतरचे काही नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो देखील मोनालिसाने शेअर केले होते. तिच्या या नवीन लूकचे चाहत्यांनी फारच कौतुक केले आहे.