आलिया भट्टने रणबीर कपूर सोबत घेतलेला सर्वाधिक र...

आलिया भट्टने रणबीर कपूर सोबत घेतलेला सर्वाधिक रोमॅन्टिक फोटो प्रसिद्ध केला (Mommy-to-Be Alia Bhatt Shares Super Romantic PIC With Ranbir Kapoor, Writes Adorable Caption)

आलिया भट्ट-रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाचा यशोत्सव साजरा करत आहेत. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरल्याने आलिया-रणबीर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिवाय त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेही सध्या हे जोडपे प्रसिद्धीच्या झोतात आहे. आलिया गरोदर आहे आणि लवकरच दोघे आई-बाबा होणार आहेत. रणबीरही आपल्या बाळाची आई होणाऱ्या आलियाची विशेष काळजी घेताना दिसतोय अन्‌ आलियाही वेळोवेळी आपल्या स्वीट हार्टवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीये. आताही सोशल मीडियावर आलियाने रणबीरबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. ज्यामुळे चाहत्यांकडून दोघांचं कौतुक होत आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर रणबीर कपूर सोबत घेतलेला सर्वाधिक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे, ज्यात दोघं एकमेकांच्या अगदी जवळ असून रणबीर आलियाला किस करताना दिसत आहे. या फोटोतून दिसणारी दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना अधिक भावली आहे. आलिया रणबीरचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. चाहते कमेंट्‌स करून दोघं किती सुंदर दिसताहेत असे म्हणत आहेत.

हा फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये ‘होम’ असे लिहिले आहे. यावरून असे लक्षात येतं की, दोघंही मागील काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ च्या प्रमोशनसाठी दिवसरात्र बिझी होते आणि आता घरात राहून चित्रपटाचे यश साजरे करत एकमेकांसोबत निवांतपणे वेळ घालवत आहेत.

अलिकडेच रणबीरने एका मुलाखती दरम्यान असे म्हटले होते की, मी माझ्या सर्व गोष्टींसाठी आलियावर डिपेंडेंट राहतो. तो म्हणाला, “मला आलिया कुठे आहे हे माहीत नसेल तर मी बाथरूमलाही जात नाही अन्‌ काही खातही नाही. ती मला माझ्या जवळ हवी असते. आम्ही एकमेकांसोबत रोमांस करतोय की गप्पा मारतोय हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये पण ती माझ्या जवळ बसलेली पाहिजे.”

या उभयतांमधील हे प्रेम पाहून चाहते त्यांच्यातील प्रेम कायम राहावे आणि हे दोघे कायम एकत्र राहावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.