आई होणार असलेल्या बिपाशा बसूने उघड केले, गर्भधा...

आई होणार असलेल्या बिपाशा बसूने उघड केले, गर्भधारणेचे पहिले काही महिने होते कडक डोहाळे (Mom-To-Be Bipasha Basu Reveals First Few Months Of Pregnancy Were Extremely Difficult)

आई-वडील होणार असल्याचे कळल्यापासून अभिनेत्री बिपासा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परंतु गरोदरपणाचे सुरुवातीचे काही महिने खूप त्रासात गेले असे अभिनेत्री बिपाशा बसूने सांगितले. गरोदरपणा दरम्यान तिला काहीही खावेसे वाटत नव्हते. त्यामुळे तिचे वजनही खूप कमी झाले होते.

त्रासापेक्षाही बाळ होणार असल्याचा आनंद निश्चितच मोठा होता. त्यामुळेच या जोडप्याने त्यांच्या पहिल्या गरोदरपणाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहतेही त्यांच्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या जोडप्याने अलीकडेच बेबी शॉवरचे आयोजन केले होते. बेबी शॉवरच्या या फोटोंमध्ये, बिपाशा तिचा बेबी बंप फ्लाँट करताना सुंदर दिसत होती.

बिपाशाच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने हे जोडपे सध्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेच्या प्रवासाबद्दल सांगणारी एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या बदलांबद्दल सांगितले आहे आणि पहिल्या तिमाहीत तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे देखील सांगितले आहे.

तिच्या रक्ताच्या अहवालाबाबत अभिनेत्री म्हणाली की, तो क्षण आमच्यासाठी खूप आश्चर्यकारक होता, जेव्हा आम्हाला कळले की आम्ही पालक होणार आहोत. तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना बिपाशा म्हणते की,  “तो खूप कठीण काळ होता. ती दिवसभर आजाऱ्यासारखी तिच्या अंथरुणावर किंवा उन्हात असायची. मी क्वचितच काही खाऊ शकत होती. त्यामुळे माझे वजन खूप कमी झाले. काही महिन्यांनंतर, मला वाटले की गर्भधारणेची ही सुरुवातीची लक्षणे कमी होत आहेत.”

यावेळी बिपाशाने असेही सांगितले की, तिला जेवणाची इच्छा होत नव्हती. खायचे तेही अतिशय कमी.  गोड तर अजिबात नाही. हा फारसा नाट्यमय बदल नसला तरी आव्हाने होती. मी काम करणे बंद केले. कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. पण सक्रिय राहण्याऐवजी फक्त झोपणे, विश्रांती घेणे आणि माझे पाय वर कसे ठेवायचे हे मला शिकायचे होते.