आई होऊ घातलेल्या बिपाशा बसूने, उघड्या पोटाने के...

आई होऊ घातलेल्या बिपाशा बसूने, उघड्या पोटाने केले बोल्ड फोटो शूट (Mom-To-Be Bipasha Basu Flaunts Her Baby Bump In New Bold Maternity Photoshoot)

आई होऊ घातलेल्या बिपाशा बसूने सोनेरी रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केलं असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बिपाशा बसूची डिलिव्हरीची तारीख जवळ येत असून लवकरच ती आई होणार आहे. तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये बिपाशाने तिचे बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने या फोटोशूटचा एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपलं बेबी बम्प फ्लाँट करताना या छायाचित्रासोबतच बिपाशाने तिच्या चाहत्यांना एक सुंदर संदेशही दिला आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा पती पालकत्वाची जबाबदारी उचलण्यासाठी सज्ज झाले आहेत. उभयता गरोदरपणा दरम्यानच्या प्रवासाचे सर्व अपडेट्स इन्स्टा फॅमिलीद्वारे त्यांच्या प्रियजनांसोबत शेअर करत असतात. अलीकडेच बिपाशाने तिच्या लेटेस्ट मॅटर्निटी फोटोशूटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री सोनेरी चमकदार ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

सटल मेकअप, रिम केलेले डोळे, गडद लिपस्टिक आणि मॅचिंग हूप इअररिंगसह तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

कॅमेऱ्यासमोर पोज देताना, बिपाशा तणावमुक्त दिसत आहे. फोटोशूट दरम्यान बेबी बंप फ्लाँट करताना ती अतिशय बोल्ड होताना दिसत आहे.

सोनेरी चमकदार ड्रेसमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देतानाच्या फोटोला बिपाशाने कॅप्शन दिली आहे. त्यात तिने लिहिलंय – “स्वतःवर नेहमी प्रेम करा. त्या शरीरावर प्रेम करा, ज्यात तुम्ही राहता. #mamatobe, #mypregnancyjourney #loveyourself, #staybodypositive, #healthiswealth #embraceyourself.”

याआधीही बिपाशाने गुलाबी स्वेट शर्टमधील तिचे फोटो शेअर केले होते. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘ममा टू बी’अशी कॅप्शन दिली आहे.