गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात अनुष्का शर्मा ग...

गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात अनुष्का शर्मा गाळतेय् घाम! (Mom to be – Anushka Sharma shares Treadmill Workout photos)

अनुष्का शर्माने आपल्या गर्भारपणाला अतिशय ग्लॅमरस बनवलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळविली. दिवस गेल्यानंतर तिचं पोट (बेबी बम्प) दिसायला लागलं तेव्हा तिनं त्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. शिवाय ‘व्होग’ या इंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचे गर्भावस्थेतले फोटो झळकले होते. या कव्हर शूटची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर तिनं पोटुशी असताना शीर्षासन करतानाचे फोटो दिले होते. शीर्षासन करण्यात तिचा नवरा विराट कोहलीने मदत केली होती. त्यावेळी तिनं असं म्हटलं होतं की, गर्भार होण्यापूर्वी मी जे व्यायाम करीत होते, ते सर्व करण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. मात्र काही व्यायाम तिनं प्रशिक्षित लोकांच्या निगराणीमध्ये केले होते. थोडक्यात काय तर अनुष्काने गर्भारपणात जडत्त्व येऊ न देता, स्वतःला छानपैकी चपळ ठेवले होते.

आता हा तिच्या गर्भारपणाचा शेवटचा महिना आहे. लवकरच ती बाळंत होईल. या शेवटच्या महिन्यातही ती चांगलीच ॲक्टीव असून तिनं आपल्या इन्स्टास्टोरीवर एक व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लाईट कलरचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून ट्रेडमिल वर धावताना ती दिसते आहे. आळस न करता तिच्या या व्यायामाने इतर गर्भवती महिलांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही. मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे साहस करावे, ही आमची प्रेमाची सूचना आहे.