आलियाचा बेबी बंपसह पहिला फोटो व्हायरल (Mom-to-b...

आलियाचा बेबी बंपसह पहिला फोटो व्हायरल (Mom-to-be Alia Bhatt’s baby bump pics from hollywood film’s set go viral, take a look)

कपूर घराण्याची नवी सून आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर दिली. या गोड बातमीमुळे रणबीर कपूर आणि सासू नीतू कपूरसह संपूर्ण कपूर कुटुंबात उत्सवाचे वातावरण असून प्रत्येकजण आलिया भारतात परतण्याची वाट पाहत आहे. आलियाला तिच्या बेबी बंपसोबत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. स्वत: लहान मुलीसारखी दिसणारी आलिया बेबी बंपसह कशी दिसेल यासाठी सगळे उत्सुक आहेत. चाहत्यांची ही इच्छा सुद्धा पूर्ण झाली आहे. आलियाचे तिच्या बेबी बंपसह फोटो व्हायरल झाले असून फोटोत ती चक्क अॅक्शन सीन शूट करत आहे.

आलिया भट्ट गरोदरपणातही  तिच्या कामात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती, पण आता आलिया भट्टच्या या चित्रपटाचे शूटिंगही संपले आहे. आलियाने पॅकअपनंतर चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया गॅल गॅडोटला मिठी मारताना दिसत आहे. आलियाने आपले फोटो शेअर करताच, तिचे बेबी बंप पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते, पण आलियाने पोस्ट केलेले बहुतांश फोटो सेल्फी क्लिकचे होते आणि काही फोटो अर्धे होते, ज्यामध्ये फक्त आलियाचा चेहरा दिसत होता.

पण आता अभिनेत्रीच्या बेबी बंपचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो तिच्या हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवरून लीक झाले असल्याचे बोलले जाते. सध्या ट्विटरवर आलियाचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हे फोटो आलियाच्या अनेक चाहत्यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे आणि तरीही ती सेटवर खूप मेहनत घेत असून अॅक्शन सीनसाठी शूटिंगही करत आहे. हे फोटो पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

आलिया लवकरच भारतात परतणार असल्याचे बोलले जाते. तिच्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून तिने आपल्या पोस्टमध्ये ती परतत असल्याचे संकेत दिले आहेत. तिने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो पोस्ट करुन मी घरी येत आहे असे कॅप्शन दिले.