आलिया भट्ट आता सादर करणार मॅटरनिटी वेअर कलेक्शन...

आलिया भट्ट आता सादर करणार मॅटरनिटी वेअर कलेक्शन (Mom-To-Be Alia Bhatt To Launch Maternity Wear Collection)

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आता उद्योजिका बनणार आहे. अभिनेत्री आपले मॅटरनिटी वेअर कलेक्शन लॉन्च करणार आहे. नुकतीच आलिया भट्टने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

दोन वर्षापूर्वी आलियाने मुलांच्या कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्री आपला नवा ब्रँड लॉन्च करणार आहे. या ब्रँडमध्ये गर्भवती महिलांसाठी स्टाइलिश आणि फॅशनेबल कपडे असतील. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर याबाबत
माहिती दिली आहे.
आलियाचा मॅटरनिटी ब्रँड आरामदायक, फॅशनेबल आणि सुरक्षितत व सुंदर असेल. या कपड्यांमुळे गरोदरपणातही महिला स्टायलिश दिसू शकतात.

आलियाने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की, दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी माझा लहान मुलांसाठीचा ब्रँड लॉन्च केला होता तेव्हा लोकांनी मला विचारले होते की, तुला मुलं नाहीत मग तू लहान मुलांचा ब्रँड का लॉन्च केला? पण आता मी स्वतःचा मॅटरनिटी ब्रँड लॉन्च करत आहे. त्यामुळे आता मला कोण असे प्रश्न विचारतील असे वाटत नाही. तरीपण मी तुम्हाला सांगते.

आलियाने पुढे लिहिले की, जेव्हा मी हे मॅटरनिटी वेअर खरेदी केले तेव्हा मी खूप खुश झाली. कारण गरोदरपणात येणाऱ्या दिवसांत आपण कसे दिसू याचा आपल्याला अंदाज नसतो. अशावेळी आपण स्टायलिश आणि नीट दिसलो नाही तर खूप चिडचिड होते.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. गरोदरपणाच्या प्रवासात ती खूप स्टायलिश आणि फॅशनेबल दिसत आहे. तिचे मॅटरनिटी कलेक्शन चाहत्यांना खूप आवडत आहे. स्टायलिश मॅटरनिटी आउटफिट्ससह बेबी बंप दाखवत अभिनेत्री अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.