आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला मिनी ड्रेसमध्ये बे...

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला मिनी ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवताना दिसली आलिया (Mom-To-Be Alia Bhatt Is Busy With Her Upcoming Film ‘Darlings’ Promotions, Actress Flaunts Baby Bump In Beautiful Mini Dress)

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या कामातून सुट्टी घेतली होती. पण आता ती तिच्या कामावर परतली आहे. लवकरच आई होणारी आलिया तिच्या आगामी डार्लिंग्स या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यादरम्यान आलियाने एक सुंदर मिनी ड्रेस घातला होता. ज्यात तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते.

अभिनेत्री आलिया भट्टचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. सध्या ती तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि खास क्षण अनुभवत आहे. ती लवकरच आई होणार आहे. आलियाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला फारसे आवडत नाही. पण जेव्हापासून तिने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची बातमी दिली तेव्हापासून तिच्या चाहत्यांची तिच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याची उत्सुकता जास्त वाढली आहे.

काही दिवसांपूर्वीच आलियाने तिच्या कामातून ब्रेक घेतला होता. ब्रेक संपल्यावर आलिया पुन्हा तिच्या कामावर परतली आहे. अभिनेत्री तिच्या आगामी डार्लिंग्स या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यावेळी ती एका सुंदर मिनी ड्रेसमध्ये तिचे बेबी बंप दाखवताना दिसली.

प्रमोशनदरम्यानचे आलिया भट्टचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्टपणे दिसत आहे.  फोटोंमध्ये आलियाने पेस्ले-प्रिंटचा मिनी ड्रेस घातला आहे. नेहमीप्रमाणेच ती सुंदर दिसत आहे. आलियाने तिचा लूक नैसर्गिक ठेवला असून केस मोकळे सोडले आहेत.

आलियाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर वेगळ्याच अंदाजात सांगितली.तिने एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर कॉम्प्युटर मॉनिटरकडे पाहत आहेत. मॉनिटरवर हार्ट इमोजी. यासोबत आलियाने, ‘आमचे बाळ, लवकरच येत आहे.’ असे लिहिले.