ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी पापाराझींना आलिया ...

ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी पापाराझींना आलिया आणि रणबीरने एकत्र दिली पोज, पारदर्शक कपड्यात बेबी बंपचे प्रदर्शन करताना दिसली अभिनेत्री (Mom-To-Be Alia Bhatt Flaunts Baby Bump In Pink Transparent Top As She Arrives For Brahmastra Promotions With Husband Ranbir Kapoor, See Pictures)

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईबाबा होणार आहेत. याशिवाय ते सध्या आपल्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक लाइव्ह सेशन केले होते. त्यावेळी रणबीरने आलियाच्या गरोदरपणामुळे वाढलेल्या वजनाची चेष्टा केली होती.

त्यावरुन लोकांनी त्याला खूप ट्रोल केले होते. खरेतर रणबीर आलियाची मस्करी करत होता. पण आलियाच्या चाहत्यांना ती गोष्ट इतकी मनाला लागली की त्यांनी रणबीरला खूप ट्रोल केले. यामुळे रणबीरला सगळ्यांची माफी सुद्धा मागावी लागली होती.

आता पुन्हा एकदा हे कपल आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र दिसले. यावेळी आलियाने गुलाबी रंगाचा पारदर्शक टॉप घातला होता आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तसेच लूज काळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. आलियाच्या त्या टॉपमधून तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते.

रणबीरने निळ्या रंगाचे टिशर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती. दोघेही खूप खुश दिसत होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले असून अऩेकजण त्यावर कमेंट करत आहेत.

काहींचे म्हणणे आहे की, आलिया तिच्या बेबी बंपसह खूप गोड दिसत आहे. तर काहीजण तिच्या बेबी बंपकडे पाहून कितवा महिना लागला याचा अंदाज बांधत आहे. काहींना तर आलिया लग्नाआधीच गरोदर होती अशीही शंका येत आहे.

आलिया तिच्या या नव्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्ट दिसत होते. आलियाने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुद्धा पोस्ट केले आहेत.