गरोदरपणाच्या घोषणेनंतर ब्रम्हास्त्रच्या प्रमोशन...

गरोदरपणाच्या घोषणेनंतर ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनल इव्हेंट निमित्त पहिल्यांदाच एकत्र कॅमेऱ्यासमोर आले आलिया आणि रणबीर (Mom-To-Be Alia Bhatt Flaunts Baby Bump As She Arrives For Brahmastra Promotions With Hubby Ranbir Kapoor, See Pictures)

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरच आई-बाबा होणार आहेत. 27 जूनला स्वतः आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आतापर्यंत आलियाने अतिशय स्टायलिश पद्धतीने तिचा बेबी बंप लपवला होता. आलियाचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तिने पोस्ट केले होते. त्यावेळी पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसला होता.

आलिया डार्लिंग्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्ट दिसत होते. आलियाने गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर ती रणबीरसोबत पहिल्यांदाच त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकत्र दिसली. त्यावेळी दोघांनीही पापराझींना पोज दिल्या. सुरुवातीला आलियाने एकटीने काही पोज दिल्या.

त्यावेळी आलियाने तपकिरी रंगाचा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता आणि आलिया देखील तिच्या बेबी बंपचे प्रदर्शन करत होती. आलियाने केस मोकळे सोडले होते. आणि चेहऱ्याला हलका मेकअप केलेला.

ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे गोड हास्य चाहत्यांना घायाळ करणारे होते. आलियाच्या फोटोंवर अनेकजण कमेंट करत आहेत. तर काहीजण तिचे बेबी बंप पाहून तिच्या गरोदरपणाचा कितवा महिना असेल याचा अंदाज लावत आहेत. काहींनी तर आलिया लग्नाआधीच गरोदर होती असे म्हटले आहे.

थोड्यावेळाने आलियासोबत तिचा पती रणबीर कपूरनेही पापाराझींना पोज दिल्या. त्याने काळे कपडे परिधान केले होते. त्यानंतर आलिया आणि रणबीरने फोटोंसाठी एकत्र पोज दिल्या. दोघांची केमिस्ट्री यावेळी दिसून येत होती. पण काही यूजर्सना मात्र त्यांच्याकडे पाहून ते नाराज असल्यासारखे वाटले.