राजसाहेब ठाकरे यांच्याकडून ‘हरिओम’चित्रपटाचे क...

राजसाहेब ठाकरे यांच्याकडून ‘हरिओम’चित्रपटाचे कौतुक (MNS Chief Raj Thackeray Appreciate The Spirit Behind Making Of Marathi Film “Hari Om”)

दादर मुंबई येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मराठी चित्रपट ‘हरिओम’च्या चित्रपटातील कलाकारांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज साहेब ठाकरे ‘हरिओम’ चित्रपटाचे कौतुक करत म्हणाले, ‘’हरिओम चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट व निर्माते तयार होणे गरजेचे आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्यानंतर अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे यांनी ‘हरिओम’ माझा प्रथम मराठी चित्रपट आहे व ‘हरिओम’ चित्रपट नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी शिवतीर्थ येथे  मुख्य अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवालकर, मनोज येरूनकर व हरिओम चित्रपटातील कलाकार  तसेच मराठी चित्रपट निर्माते फैजल भाई पोपेरे हजर होते.