बिकीनी घातलेले आपले ठेवणीतले फोटो शेअर करून सार...

बिकीनी घातलेले आपले ठेवणीतले फोटो शेअर करून सारा अली खान मिस करतेय् जीवलग मैत्रिणींना (Missing You Too Much… Says Sara Ali Khan As She Shares A Throwback Bikini Pics With BFF)

सारा अली खान Sara Ali Khan) सध्या तिच्या अतरंगी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळेच कदाचित तिला आपल्या जीवलग मैत्रिणींसोबत केलेल्या अतरंगीपणाची आठवण येत असावी. म्हणूनच तिने आपल्या मैत्रिणींसोबत सुट्टी घालवलेले ठेवणीतले काही फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केले आहेत.

साराने आपल्या मैत्रिणींसोबतचा फोटो शेअर करून त्यांना टॅग केले आहे आणि तुम्हा दोघींना मी खूप मिस करत आहे, असे लिहिले आहे. साराने या फोटोमध्ये प्रिंटेड ब्ल्यू बिकिनी घातली आहे आणि नेहमीप्रमाणे ती अतिशय फिट आणि सुंदर दिसत आहे. तिच्या मैत्रिणी देखील बीच वेअरमध्ये दिसत आहेत.

Sara Ali Khan

साराच्या या फोटोला चाहत्यांकडून भरपूर पसंती दर्शविली जात आहे. पारंपरिक अवतार असो वा हॉट बिकिनी असो, सारा कोणत्याही पेहरावामध्ये तितकीच गोड दिसते. तिच्याकडे एक वेगळाच अंदाज असल्याने ती कधीच वल्गर वाटत नाही.

सारा सध्या अतरंगीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचे चकाचक गाणं देखील लोकांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डोक्यावर घेतलं आहे. मागील काही दिवसांत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आई अमृता सिंग, सहकलाकार जान्हवी कपूर आणि चित्रपटाचे निर्माता यांच्यासोबत जिथे जिथे फिरली तिथले सर्व फोटोही तिने सोशल मिडियावर पोस्ट केले होते. आणि चाहत्यांनीही ते पसंत केले होते. साराचं काम जरा जास्तच वाढलेलं दिसतंय. म्हणूनच सध्या तिच्या डोक्यात सहलीचे विचार येत असावेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम