मिस युनिव्हर्स हरनाज संधूने अनोखा पोशाख घालून स...

मिस युनिव्हर्स हरनाज संधूने अनोखा पोशाख घालून सुष्मिता आणि लाराला दिले ट्रिब्युट, अखेरचा रॅम्पवॉक करताना भावूक झाली हरनाज(Miss Universe Harnaz Sandhu Paid Tribute To Sushmita And Lara By Wearing An Offbeat Dress: Harnaz Became Emotional On Her Farewell Rampwalk)

मिस युनिव्हर्स या स्पर्धेचा महाअंतिमसोहळा नुकताच पार पडला. या स्पर्धेत युएसएची आर’बोनी गैब्रिएलने बाजी मारली. तिने यावर्षीचा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. गैब्रिएलच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा ताज घालण्यासाठी माजी युनिव्हर्स भारताची हरनाज संधू स्टेजवर आली. पुन्हा एकदा मंचावर येऊन तसेच मिस युनिव्हर्स म्हणून अखेरचा रॅम्प वॉक करताना हरनाजचे अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

हरनाजने मंचावर पाऊल ठेवताच क्षणी तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मिस युनिव्हर्स म्हणून अखेरचा रॅम्प वॉक करताना तिचे पाय लटपटायला लागले होते. संपूर्ण वॉक दरम्यान तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याला हरनाजने शिमरी काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ड्रेसच्या मागील बाजूस 1994 मध्ये मिस युनिव्हर्स झालेली बॉलिवू़ड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये मिस युनिव्हर्स झालेली लारा दत्ता यांचे फोटो प्रिंट केले होते. अभिनेत्री सुष्मिता सेनही मिस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. त्यानंतर लाराने जिंकला होता. लारानंतर 21 वर्षांनी हरनाजने हा किताब पुन्हा एकदा भारताच्या नावावर केला होता. आता एका वर्षाने हरनाज जेव्हा पुन्हा एकदा त्याच मंचावर गेली तेव्हा तिने आपल्या पोशाखातून सुष्मिता सेन आणि लारा दत्ताला खास अंदाजात ट्रिब्यूट दिले. लोकांना हरनाजची ही कल्पना खूप आवडली. त्यावेळी तिने सॉफ्ट ओपन कर्ली हेयर आणि स्मोकी आय मेकअप केला होता. हरनाजचा हा स्टनिंग लूक पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी हरनाजने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड, 2018 मध्ये मिस मॅक्स इमर्जिंग स्टार, 2019 मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हे किताब आपल्या नावावर केले होते. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.