मिस युनिव्हर्स हरनाज संधुने पहिल्यांदाच प्रसिद्...
मिस युनिव्हर्स हरनाज संधुने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली आपली झगमगीत छायाचित्रे (Miss Universe, Harnaaz Sandhu Shared Her First Sizzling Pics)

चंदीगडमधील २१ वर्षीय हरनाज संधुने Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) ही स्पर्धा जिंकल्यानंतर संपूर्ण देशवासियांना तिचा अभिमान वाटत आहे. जगभरातून तिचं कौतुक केलं जात आहे. हरनाजने भारताला तब्बल २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून दिला आहे. व्यवसायाने मॉडेल असणारी हरनाज सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. या सौंदर्यवतीने पहिल्यांदाच तिची काही झगमगती छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत.

हरनाज संधूचे सोशल मीडियावर पहिल्यापासूनच अनेक चाहते होते परंतु आता मिस युनिव्हर्स बनल्यानंतर त्यात अधिक भर पडली आहे. आता ती जगप्रसिद्ध झाली आहे. तिच्या या झगमगत्या आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे.

हरनाजने आपल्या या फोटोमध्ये पिंक कलरचा ब्लेझर घातला आहे. ज्यात तिने इनर घातलेले नाही. या सुंदर डीप नेक ब्लेझरमध्ये तिची क्लीवेज स्पष्टपणे दिसत आहे. या आऊटसह तिने मिस युनिव्हर्सचा मुकुटही घातला असून, तो तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. हरनाजच्या या फोटोवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सर्वजण तिची प्रशंसा करत आहेत.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
मिस युनिव्हर्सचा ताज मिळवून हरनाज आज सेलिब्रिटी बनली असली तरी याआधीही तिने अनेक किताब जिंकले आहेत. ज्यामध्ये मिस चंदीगड २०१७, मिस मॅक्स इमर्जिंग इंडिया २०१८ आणि फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ चा किताब यांचा समावेश आहे. ती बऱ्याच दिवसांपासून मॉडेलिंग करत आहे. याशिवाय हरनाजने पंजाबमधील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम



हरनाज कौर संधूच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी २०१७ मध्ये तिचे वार्षिक उत्पन्न १ दशलक्ष डॉलर्स होते, जे आता २०२१ मध्ये ५ दशलक्ष डॉलर्स झाले आहे. हरनाजची भारतीय रुपयात एकूण संपत्ती ३८ कोटी इतकी आहे.