मिस यूनिव्हर्स हरनाज संधू, टॉपच्या अभिनेत्यासोब...

मिस यूनिव्हर्स हरनाज संधू, टॉपच्या अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक (Miss Universe Hanrnaaz Sandhu Wants To Debut In Bollywood With Her Favorite Superstar)

मिस युनिव्हर्स (Miss Universe) हा मानाचा किताब मिळवून २९ वर्षे वयाची हरनाज संधू (Hanrnaaz Sandhu) रातोरात लोकप्रिय झाली आहे. मॉडेल असलेली हरनाज बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. एका मुलाखतीत तिनं आपला मनोदय व्यक्त केला आहे.

Hanrnaaz Sandhu

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपण जागतिक किर्तीची लोकप्रियता मिळवू, अशी अपेक्षा नव्हती, असं सांगून हरनाज या मुलाखतीत सांगते की, १७ वर्षांची असल्यापासून मी प्रियंका चोप्रा, लारा दत्ता, सुश्मिता सेन यांच्याकडून प्रेरणा घेत आले.

Hanrnaaz Sandhu

हरनाज मॉडेल असली तरी एक चांगली अभिनेत्री आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याबाबत तिनं आपलं मन मोकळं केलं. “मला संधी मिळाली तर मी नक्कीच बॉलिवूडमध्ये जाईन. तेही माझं एक स्वप्न आहे,” असं ती सांगते.

Hanrnaaz Sandhu

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हरनाज पुढे सांगते, “ॲक्टींग हा माझा व्यवसाय आहे. मी ५ वर्षे नाटकात काम केलं आहे. महिला काही नवनीत घडवू शकत नाही, असे ज्या लोकांचे बुरसट विचार आहेत, त्याला मला छेद द्यायचा आहे. ही गोष्ट चित्रपटातून साध्य होईल.”

Hanrnaaz Sandhu

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Hanrnaaz Sandhu

संधी मिळाली तर कोणते दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्याबरोबर काम करायला आवडेल? – या प्रश्नावर हरनाजने संजय लीला भन्साली यांचं नाव घेतलं. “अन्‌ मी शाहरूख खानला खूप सन्मान देते, हे मी आधीच सांगितलं आहे.”

हरनाज पुढे सांगते, “तो जितकी मेहनत अद्यापही घेतो आहे, ती कोणीच घेऊ शकत नाही. शिवाय त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो एक उत्कृष्ट कलाकार व उमदा माणूस आहे.”