आरशांतून शुभ ऊर्जा बाहेर परावर्तित होते (Mirror...

आरशांतून शुभ ऊर्जा बाहेर परावर्तित होते (Mirror Is The Positive Energy Reflector)

फेंगशुईनुसार घरात खूप आरसे नसावेत. असल्यास ते झाकून ठेवावेत असे म्हणतात. हे खरे आहे का? यामागील कारण काय?
आरशांतून ऊर्जा परावर्तीत होते. घरात खूप आरसे असणे म्हणजे घरातील शुभ ऊर्जा परावर्तित होऊन बाहेर जाते. व घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा साठा वाढतो. शिवाय आरशाची जागा सुद्धा महत्त्वाची असते. मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा आणि शयनकक्षेत आरसा नसावा. तसेच इतर ठिकाणचे आरसे देखील झाकून ठेवावेत.

माझा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गेली 9 वर्षे मी या व्यवसायात आहे. पण अजूनही हवी तशी प्रगती झालेली नाही. गाडीत चांगली ऊर्जा निर्माण होण्यासाठी व प्रगती होण्यासाठी काय करावे लागेल?
तुमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, जो धातु तत्वामध्ये मोडतो. त्यासाठी तुम्ही कोणत्या तत्वाचे आहात हे माहीत असावयास हवे. जर तुमचं तत्व विरुद्ध असेल तर व्यवसायात त्रास संभवतो किंवा प्रगती होत नाही. गाडीत चांगली ऊर्जा निर्माण होण्यासाठी शुभ चिन्हांचा वापर करावा. वाहन दुर्घटना नाशक यंत्र गाडीत लावल्यास तुम्हाला फरक पडेल.

स्वयंपाकघरातील ओटा व बाथरूमचे दार समोरासमोर असल्यास काय करावे?
स्वयंपाकघरात ओटा व बाथरूम समोरासमोर असल्यास बाथरूमच्या दरवाजावर पाकुआ मिरर लावावा. ज्यामुळे बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा स्वयंपाकघरात मिसळणार नाही. तसेच बाथरूमच्या उंबरठ्याला लाल रंग लावावा.

माझी मुलगी नेहमी निरुत्साही असते. सतत आजारी असते. फेंगशुईप्रमाणे घरात काही बदल केल्यास ही परिस्थिती बदलेल का?
निरुत्साह आणि सततची आजारपणं घरातील नकारात्मक ऊर्जा वाढली असल्याचे दर्शवितात. घरात इतरही काही चुकीच्या गोष्टी असू शकतील. घरात बदल करण्याची तुमची तयारी असलेली पाहता तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तूतज्ज्ञाला आधी घर दाखवून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार घरात बदल केल्यास परिस्थितीत नक्कीच सुधारणा होईल.