शॉर्ट्स खूपच तोकडी झाल्याने मीरा राजपूत झाली ट्...

शॉर्ट्स खूपच तोकडी झाल्याने मीरा राजपूत झाली ट्रोल (Mira Rajput Wore Such Shorts, Getting Trolled Badly)

सध्या सोशल मीडियाची चलती आहे, जिथे प्रत्येकजण सक्रिय आहे. मग ते मीडियाचे लोक असो, सामान्य जनता असो किंवा अगदी सेलेब्सना देखील सोशल मीडियाचे वेड लागले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या सुपरिचित व्यक्तीचे लोकांच्या नजरेतून सुटणे अशक्य होते. अन्‌ त्या व्यक्ती जर सेलेब्स असतील तर मीडियाचे कॅमेरे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून असतात. सोशल मीडिया या सेलेब्सना डोक्यावरही घेतो आणि कधीकधी त्यांना वाईटरित्या ट्रोलही करतो. नुकतेच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतसोबत देखील असेच काहीसे घडले आहे. तिच्या कपड्यांमुळे ती वाईटरित्या ट्रोल झाली आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

काही दिवसांपूर्वी मीरा राजपूत, पती शाहिद कपूर आणि दोन्ही मुलांसोबत मालदीव व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मालदीव येथील त्यांचे फोटोही सोशल मीडियावर सतत व्हायरल होत होते अन्‌ लोकांना पसंतही पडले. परंतु आता जेव्हा ते मालदीवहून मुंबईला परतले, तेव्हा मीराला विमानतळावरून बाहेर पडताना मीडियाने कॅमेऱ्यात कैद केले आणि तिचा तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. युजर्सनी मीरा राजपूतचा हा व्हिडिओ पाहताच तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने त्याच्या इन्स्टा हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मीरा राजपूरने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मीराने वर पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातला आहे, अन्‌ खाली डेनिम शॉर्ट्स घातली आहे. खरं तर मीराच्या या कपड्यांमध्ये काहीही वावगं नाहीच आहे, पण ट्रोलर्सना मीरा राजपूतचा आउटफिट अजिबात आवडला नाही आणि त्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. तुम्ही पाहा हा व्हिडिओ –

मीरा राजपूतच्या कपड्यांवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, “शॉर्ट्स इतकी तोकडी आहे की, काही घातलेलेच नाही असे वाटते.” तर कोणीतरी लिहिले आहे की, “कपडे तरी पूर्ण घालायचे होते, मीराजी.” याशिवाय कोणीतरी लिहिले आहे की, “मुलांनी तरी पूर्ण कपडे घातले आहेत पण आईने नाही.”

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

तसं पाहिलं तर शाहिद कपूर आणि त्याचे कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतं. शाहीद कपूर आजकाल त्याच्या आगामी ‘जर्सी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, ज्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.