मिनिषा लांबाचा वाढदिवस : बघा तिचे हॉट व सुंदर फ...

मिनिषा लांबाचा वाढदिवस : बघा तिचे हॉट व सुंदर फोटो (Minisha Lamba is Celebrating Her Birthday : See Her Hot And Beautiful Photos)

आपल्या चंदेरी दुनियेत नशिबाला खूप महत्त्व आहे. इथे काही नट्यांचे नशीब असे फळफळते की, त्या कायम यशस्वी होतात. तर काही जणींची सुरुवात धडाकेबाज झाली तरी पुढे त्यांचं नशीब साथ देत नाही. अशा अभिनेत्रींच्या यादीत मिनिषा लांबा आहे. आज तिचा वाढदिवस आहे.

Picture Courtesy : Instagram

१८ जानेवारी ११९८५ मध्ये मिनिषाचा जन्म दिल्लीत झाला. सिनेमात तिला भरघोस यश मिळालं नाही, पण ती सोशल मिडियावर बरीच ऍक्टिव्ह आहे. वेळोवेळी आपले बोल्ड आणि हॉट फोटो टाकून ती खळबळ माजवते. त्यामुळे या ठिकाणी तिचे बरेच चाहते आहेत.

Picture Courtesy : Instagram

बॉलिवूडमध्ये मिनिषाचे करिअर २००५ मध्ये सुरू झाले. या क्षेत्रात येण्यापूर्वी ती मॉडेलिंग व जाहिरात क्षेत्रात होती. दिल्लीला कॉलेजात असतानाच तिला ‘यहां’ या चित्रपटाची ऑफर आली नि तिचे सिनेमा करिअर सुरु झाले. कॉर्पोरेट, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., दस कहानियां, बचना ए हसीनो, वेल डन अब्बा, भजा फ्राय २ आणि ३ व भूमी चित्रपटांमध्ये मिनिषा चमकली. छूना है आसमान, तेनाली रामा, इंटरनेट वाला लव्ह या हिंदी मालिकातही तिने काम केले. शिवाय बिग बॉसच्या ८ व्या सीझनमध्ये ती एक स्पर्धक होती.

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

तिची दोन प्रेमप्रकरणे झालीत. राज बब्बरचा मुलगा आर्य याच्याबरोबर तिचे प्रेमजीवन रंगात आले होते. पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. नंतर ती मुंबईच्या जुहू नाईट क्लबचे मालक  रयाम थम यांच्या प्रेमात पडली. या प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात झाले. २०१५ साली दोघांनी गुपचुप लग्न केले. ५ वर्षे त्यांचा संसार फुलला. पण नंतर वैवाहिक जीवनात कटुता आल्याने ते दोघे परस्पर संमतीने विलग झाले.

Picture Courtesy : Instagram

Picture Courtesy : Instagram

या देखण्या नटीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!