करोनामुक्त होताच मिलिंद सोमण धावू लागला… ...

करोनामुक्त होताच मिलिंद सोमण धावू लागला… (Milind Soman runs Immediately after Corona; said – ‘Recovery is necessary’)

सुप्रसिद्ध मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमण फिटनेसबाबत किती जागरूक आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. बरेचदा सोशल मिडियावर देखील तो फिटनेससंबधीची माहिती पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वी मिलिंदला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याने स्वतःला घरीच क्वारंटाईन केले होते. आणि आता त्याची करोनाची चाचणी नकारात्मक आली असल्याचे कळल्यानंतर मिलिंदने जराही उसंत न घेता आपल्या नेहमीच्या दिनचर्येस सुरुवात केली आहे. त्याने आपला धावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्याला आता कसं वाटतंय ते सांगितले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

धावत असतानाचा व्हिडिओ शेअर करत मिलिंद सोमणने लिहिलंय – ‘जवळपास ४० मिनिटांत आरामात ५ किलोमीटर अंतर धावल्यानंतर आता मला बरं वाटतंय. पु्न्हा एकदा रस्त्यावर धावल्यानंतर आराम वाटतो आहे.’ कोविड-१९ नंतरच्या आणि लांबलेल्या कोविडच्या गोष्टी ऐकतोय… सुरुवातीला सावकाश चालणार आहे… दर दहा दिवसांनंतर फुफ्फुसांचं कार्य आणि रक्ताची तपासणी करून घ्यायला हवी.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

मिलिंद सोमणने असंही लिहिलंय – मला माहीत आहे की, ‘कोविड – १९ एक वस्तू आहे… गेल्या २५ वर्षांत माझ्यात फ्लूचे देखील लक्षण दिसले नाही. त्यामुळे साधारण ताप आणि थकवा ही माझ्यासाठी असामान्य गोष्ट होती. मला असा विश्वास आहे की, आपण सर्वजण सावध होत आहोत… आणि आपल्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत’

आता करोनातून मुक्त झाल्यानंतर पूर्वीसारखं फिट होण्यासाठी मिलिंदने मेहनत करायला सुरुवात केली आहे. स्वतःला लवकरात लवकर फिट कसं ठेवता येईल, हे त्याला चांगलंच ठाऊक आहे.